

India Archery
sakal
ढाका : भारताच्या पुरुष तिरंदाजांनी आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये इतिहास रचला. यशदीप भोगे, अतानू दास आणि राहुल या भारतीय तिरंदाजांनी पुरुषांच्या सांघिक रिकर्व्ह प्रकारात दक्षिण कोरियाच्या खेळाडूंवर शूटऑफमध्ये मात केली आणि भारताला तब्बल १८ वर्षांनंतर सुवर्णपदक मिळवून दिले.