indian game: राष्ट्रकुलच्या आयोजनावर; कबड्डी, खो-खोचे भवितव्य, २०३० मधील स्पर्धेसाठी भारताची बोली, नोव्हेंबरमध्ये स्थळाबाबत निर्णय
India Commonwealth Games 2030: भारतातील ऑलिंपिक संघटनेने २०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अधिकृतपणे बोली लावण्याचा निर्णय घेतला आहे. कबड्डी, खो-खो, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटन आणि तिरंदाजी या हमखास पदक मिळणाऱ्या खेळांचा समावेश होणार आहे.
नवी दिल्ली : वर्ष २०३० अखेरीस होत असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी भारताकडून अधिकृत बोली लावण्यात आली आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या (आयओए) विशेष सर्वसाधारण बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.