
Yonex-Sunrise India Open 2025 : अनुपमा उपाध्यायने Yonex-Sunrise India Open 2025 स्पर्धेत बुधवारी दोन उदयोन्मुख महिला एकेरी खेळाडूंमधील लढाई जिंकली, तर मालविका बनसोड आणि प्रियांशु राजावत यांनी त्यांच्यापेक्षा वरच्या क्रमांकाच्या प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देताना सर्वोत्तम कामगिरी केली, परंतु दुर्दैवाने त्यांना बुधवारी येथील केडी जाधव इनडोअर हॉलमध्ये योनेक्स-सनराईज इंडिया ओपन २०२५ च्या पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
मालविकाने पहिल्या गेममध्ये दोन गेम पॉइंट वाचवले आणि दुसऱ्या गेममध्ये महिला एकेरी तिसऱ्या मानांकित चीनच्या हान यू विरुद्ध ७-१४ ते १६-१६ असा संघर्ष केला. पण, एक तास आणि सहा मिनिटांत २०-२२, २१-१६, २१-११ असा पराभव पत्करावा लागला. राजावतने दुसऱ्या गेममध्ये मॅच पॉइंट वाचवला आणि २०२३ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेत्या व सहाव्या मानांकित कोडाई नारोकाविरुद्धचा सामना निर्णायक गेममध्ये नेला. पण, एचएसबीसी बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ७५० स्पर्धेत एक तास २२ मिनिटे चाललेल्या सामन्यात तो २१-१६, २०-२२, २१-१३ असा पराभव टाळू शकला नाही.