
India Open 2025: गतविजेत्या पीव्ही सिंधूसह Yonex-Sunrise India Open 2025 स्पर्धेत किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा हे दुसऱ्या फेरीत पोहोचले. सिंधूने दीर्घ स्पर्धेच्या ब्रेकनंतर पुनरागमन करताना चायनीज तैपेईच्या सुंग शुओ युनवर सरळ गेम्सचा विजय नोंदवला, तर किरण जॉर्जने मंगळवारी केडी जाधव हॉलमध्ये योनेक्स-सनराईज इंडिया ओपन २०२५ बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत जपानच्या युशी तनाकाविरुद्ध जोरदार संघर्ष केला.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न झाल्यानंतर पहिलीच स्पर्धा खेळणाऱ्या सिंधूला ५१ मिनिटांच्या लढतीत तिच्या लयीत अडचण आली. पण , तिने उल्लेखनीय कामगिरी करताना २१-१४, २२-२० असा विजय मिळवला. किरणने तीन मॅच पॉइंट गमावले आणि स्वतःचे तीन पॉइंट वाचवले. किरणने एचएसबीसी बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ७५० स्पर्धेच्या पहिल्या फेरीत एक तास ११ मिनिटांत तनाकाला २१-१९, १४-२१, २७-२५ असे पराभूत केले.