

Lakshya Sen
Sakal
माजी विजेता लक्ष्य सेन, सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी त्यांच्या इंडिया ओपन २०२६ मोहिमेची दमदार सुरुवात केली. चायनीज तैपेईचा चौथा मानांकित चाऊ टिएन चेन, जपानचा सातवा मानांकित कोदाई नारोका आणि फ्रान्सचा सहावा मानांकित अॅलेक्स लॅनिएर यांना स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाहेर जावे लागले.
भारतीय बॅडमिंटन संघटनेद्वारे आयोजित एचएसबीसी बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर ७५० स्पर्धेचे सामने येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये खेळवले जात आहेत.