Badminton: महिला एकेरीत भारतीय खेळाडूंमध्ये जेतेपदाची झुंज; ओडिशा मास्टर्स बॅडमिंटन, पुरुषांच्या एकेरीत किरण जॉर्जही अंतिम फेरीत
All-Indian Women’s Singles Final at Odisha Masters: ओडिशा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या उन्नती हुडा व इशरानी बरुआ अंतिम फेरीत. पुरुष एकेरीत किरण जॉर्जने दमदार विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला.
कटक : भारताच्या दोन महिला खेळाडूंमध्ये जेतेपदाची झुंज रंगताना दिसणार आहे. अव्वल मानांकित उन्नती हुडा व इशरानी बरुआ यांच्यामध्ये अजिंक्यपदासाठी लढाई होणार आहे. ओडिशा मास्टर्स सुपर १०० ही बॅडमिंटन स्पर्धा कटक येथे सुरू आहे.