esakal | ICC T20 World Cup 2021 : ‘मौका-मौका’चा प्रसिद्ध प्रोमो रिलीज; पाहा सामन्याआधीची जाहिरात
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

India-Pakistan : ‘मौका-मौका’चा प्रसिद्ध प्रोमो रिलीज; पाहा जाहिरात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे चाहते जसे ॲशेस कसोटी मालिकेची आतुरतेने वाट पाहत असतात तशीच प्रतीक्षा भारत आणि पाकिस्तानचे चाहते दोन्ही संघात होणाऱ्या सामन्यांची वाट पाहत असतात. कारण, आयसीसीद्वारे खेळल्या जाणाऱ्या ट्रॉफीमध्येच दोन्ही संघात लढत पाहायला मिळत आहे. दोन्ही देशांचे संबंध चांगले नसल्याने द्विपक्षीय मालिका बंद आहे. यामुळे या सामन्याला विशेष महत्त्व आहे. तसेच महत्त्व ‘मौका-मौका’ या जाहिरातीला सुद्धा आहे.

कोरोनामुळे आयसीसीचा विश्वचषक भारता ऐवजी युएई आणि ओमानमध्ये आयोजिण्यात आला आहे. विश्वचषकासाठी दोन ग्रुप आहेत. ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडीज तर बी ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या लढतीने ग्रुप बी मधील लढतीला सुरुवात होणार आहे. हा सामना दुबईत २४ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.

हेही वाचा: सोने खरेदीची हीच योग्य वेळ; दसऱ्याला सुवर्ण संधी

आयसीसीद्वारा आयोजिण्यात आलेल्या स्पर्धेत दोन्ही संघात एकूण १७ सामने खेळले गेले आहेत. यातील १३ सामने भारताने जिंकले तर तीन सामन्यात पाकिस्तानने विजय मिळविला. एक सामना अनिर्णित राहिला. यामुळे कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचा पराभव करण्याची खेळाडूंसह चाहत्यांची इच्छा असते. पाकिस्तानला पराभूत केले म्हणजे भारताने विश्वचषक जिंकल्यासारखे असते, हे सर्वांना माहिती आहे.

यामुळे मागील काही सामन्यांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सामन्यावर येणारी ‘मौका-मौका’ ही जाहिरात चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. १७ ऑक्टोबरपासून वर्ल्डकपला सुरुवात होणार असली तरी भारत आणि पाकिस्तानचा २४ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यावर सर्वांच्या नजरा आहे. याच सामन्यासाठी स्टार स्पोर्ट्सने मौका-मौका जाहिरातीचा प्रोमो रिलीज केला आहे.

हेही वाचा: दुहेरी हत्याकांडाने यवतमाळला हादरा; पूर्ववैमनस्यातून काढला काटा

तुम्हालाही असेल जाहिरातीबाबत उत्सुकता?

स्टार स्पोर्ट्सने मौका-मौका जाहिरातीचा प्रोमो रिलीज करताना ट्वीटही केले आहे. ‘भारत आणि पाकिस्तानची लढत आता फार लांब नाही. तुम्ही ही लढत पाहण्यास तयार असालच. पण त्याच बरोबर तुम्हाला जाहिरातीबाबत उत्सुकता असेल’, असे ट्वीटमध्ये स्टारने मौका-मौका जाहिरातीवर म्हटले आहे.

काय आहे ही जाहिरात?

‘मौका-मौका’ ही जाहिरात भारत-पाकिस्तानच्या सामन्यासाठी चांगलीच प्रसिद्ध आहे. यात पाकिस्तान आपण विजय होणार असल्याचा दावा करतो तर भारत आपल्या स्टाईलने आपणच नेहमीप्रमाणे विजयी होणार असे दाखवीत असतो. या जाहिरातीत दिवाळीसाठी वापरल्या जाणाऱ्या फटाक्यांचाही वापर केला जातो. पराभव झाल्यानंतर पाकिस्तानला फटाक्याचा बॉक्स तसाच ठेवावा लागतो, हेही दाखविण्यात येते.

loading image
go to top