
भारतात यंदा नोव्हेंबर- डिसेंबर दरम्यान मुलांचा ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप २०२५ रंगाणार आहे. यासाठी तयारी सुरू झाली असून शनिवारी आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने गटवारी जाहीर केली आहे.
या गटवारीनुसार भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत हे दोन संघ आमने-सामने येणार हे निश्चित झाले आहे. पण अद्याप वेळापत्रक समोर आलेलं नसल्याने किती तारखेला हे दोन संघ आमने-सामने असणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.