India Prepares for Asia Cup 2025
esakal
Suryakumar Yadav Leads T20 Squad : श्रेयस अय्यरला वगळल्याचे आश्चर्य, शुभमन गिलची निवड आणि थेट उपकर्णधार, पुरेशी विश्रांती मिळाली असतानाही इंग्लंड दौऱ्यातील अखेरच्या कसोटीतीतून जसप्रीत बुमराची विश्रांती, तोच बुमरा आशिया करंडक स्पर्धेसाठी सज्ज... प्रश्न निर्माण करणाऱ्या अशा सर्व घडामोडींचे एकच कारण, पुढील वर्षी होणारी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा. भारतीय निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने याच दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केलीय.