Chess Final: संयम विरुद्ध आक्रमकतेची पटावर लढाई; हंपी दिव्यामध्ये बुद्धिबळ जगज्जेतेपदाचा सामना, भारतीय खेळाडूंमध्ये आजपासून चुरस
Womens Chess Final : जॉर्जियामधील बुद्धिबळ विश्वकरंडक अंतिम फेरीत भारताच्या दोन खेळाडूंमध्ये लढत ठरणार आहे. अनुभवी कोनेरू हंपी आणि आक्रमक दिव्या देशमुख यांच्यात जगज्जेतेपदाचा थरारक सामना रंगणार आहे.
बातुमी (जॉर्जिया) : भारताकडेच महिलांच्या बुद्धिबळ विश्वकरंडकाचे अजिंक्यपद राहणार हे शुक्रवारी रात्री निश्चित झाले आहे. आंध्र प्रदेशच्या कोनेरू हंपीने हिने चीनच्या लेई टिंगजी हिला पराभूत करीत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.