
Javelin Throw competition: नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण व पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक पटकावत भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकवला आणि देशामध्ये भालाफेकीचे वारे जोरात वाहू लागले.
याच पार्श्वभूमीवर आता यावर्षी भारतामध्ये सप्टेंबर महिन्यात प्रथमच भालाफेकीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये नीरज चोप्रासह जगातील स्टार खेळाडूंच्या सहभागाची दाट शक्यता आहे. भारतीय ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने या स्पर्धेबाबत मंगळवारी घोषणा करण्यात आली.