Asian Shooting Championship: ऐश्वर्य तोमर, ॲड्रियनला सुवर्णपदक; आशियाई नेमबाजी, भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी कायम
Aishwary Tomar: आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाजांची दमदार कामगिरी सुरूच आहे. ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर आणि ॲड्रियन कर्माकर यांनी सुवर्णपदकाची कमाई केली असून भारताच्या खात्यात आजवर तब्बल २५ सुवर्णपदकं जमा झाली आहेत.
नवी दिल्ली : भारतीय नेमबाजांची आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेतील पदकांची लयलूट रविवारीही कायम राहिली. ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर याने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात सुवर्णपदक पटकावले.