esakal | INDvsWI : भारताचे वर्चस्व; 468 धावांच्या आव्हानापुढे विंडीज 2 बाद 45
sakal

बोलून बातमी शोधा

Ishant Sharma

या आव्हानापुढे विंडीजची सलामीची जोडी पुन्हा अपयशी ठरली. क्रेंग ब्रेथवेटला ईशांतने अवघ्या 3 धावांवर असताना बाद केले. नंतर शमीने विंडीजला दुसरा धक्का दिला. कॅम्पबेल 16 धावा करून परतला. तिसऱ्या दिवसअखेर डॅरेन ब्राव्हो 18 आणि ब्रुक्स 4 धावांवर खेळत होते.

INDvsWI : भारताचे वर्चस्व; 468 धावांच्या आव्हानापुढे विंडीज 2 बाद 45

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जमैका : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व मिळविले असून, तिसऱ्या दिवसअखेर भारताने ठेवलेल्या 468 धावांच्या आव्हानापुढे विंडीजची 2 बाद 45 अशी अवस्था झाली आहे.

पहिल्या डावात हनुमा विहारीच्या शतकामुळे हतबल झालेल्या वेस्ट इंडीज संघाचे पहिल्या डावात कंबरडे जसप्रित बुमराने मोडले होते. त्याच्या हॅट्ट्रिकमुळे हवालदिल झालेल्या वेस्ट इंडीजची भारताविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर 7 बाद 87 अशी दारुण अवस्था झाली होती. त्यानंतर रविवारी तिसऱ्या दिवशी भारताने विंडीजचा डाव 117 धावांत संपुष्टात आणून मोठी आघाडी घेतली बुमरा भारताकडून हॅट्ट्रिक करणारा तिसरा गोलंदाज ठरला होता. 

त्यानंतर दुसऱ्या डावात भारताची सुरवात खराब झाली. पहिल्या डावातील अर्धशतकवीर मयांक अगरवाल अवघ्या 4 धावांवर बाद झाला. राहुलही रोचचाच शिकार ठरला. कर्णधार कोहलीला तर भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे भारताची अवस्था 3 बाद 36 अशी झाली. अखेर अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतकी खेळी करत भारताला दीडशेच्या पार नेले. विहारीचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर कर्णधार कोहलीने 4 बाद 168 वर डाव घोषित केला आणि विंडीजसमोर 468 धावांचे आव्हान ठेवले.

या आव्हानापुढे विंडीजची सलामीची जोडी पुन्हा अपयशी ठरली. क्रेंग ब्रेथवेटला ईशांतने अवघ्या 3 धावांवर असताना बाद केले. नंतर शमीने विंडीजला दुसरा धक्का दिला. कॅम्पबेल 16 धावा करून परतला. तिसऱ्या दिवसअखेर डॅरेन ब्राव्हो 18 आणि ब्रुक्स 4 धावांवर खेळत होते.

loading image
go to top