India T20 World Cup 2026 schedule
esakal
भारतीय संघाने २०२५ चा शेवट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयाने केला आहे. त्यानंतर आता संघाचं पुढचं लक्ष न्यूझीलंड विरुद्ध मालिका आणि टी-२० विश्वकप स्पर्धा असणार आहे. त्यासाठी आज १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणादेखील झाली आहे. आगामी टी-२० विश्वकप स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरु होणार असून भारत आणि श्रीलंका या स्पर्धेचे आयोजक असणार आहेत.