India T20 World Cup Squad : मोहम्मद शमी टीम इंडियात परतणार, बुमराहच्या फिटनेस वर प्रश्नचिन्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India T20 World Cup Squad mohammed shami

India T20 World Cup Squad : मोहम्मद शमी टीम इंडियात परतणार, बुमराहच्या फिटनेस वर प्रश्नचिन्ह

India T20 World Cup Squad mohammed shami : यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या आशिया कपच्या सुपर 4 फेरीत दोन पराभवानंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी मोहम्मद शमी टीम इंडियात परतणार आहे. मात्र भारताचा नंबर 1 वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत अद्याप स्पष्ट झालेली नाही.

मोहम्मद शमी गेल्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. मात्र नुकत्याच झालेल्या टी-20 सामन्यांमध्ये शमीला टीम इंडियात स्थान मिळत नव्हते. आशिया कपमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे मोहम्मद शमीच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा: Asia Cup मध्ये पराभूत होणारा संघ खेळणार T20 World Cup - रोहित शर्मा

निवड समितीच्या एका सदस्याने इनसाइड स्पोर्ट्सवर सांगितले की, बुमराहच्या पुनरागमनाचा निर्णय होईपर्यंत आम्ही यावर कोणताही निर्णय घेणार नाही. या आठवड्यात बुमराह एनसीएमध्ये परतेल, जिथे त्याच्या दुखापतीची तपासणी केली जाईल. एकदा आम्हाला स्पष्ट कल्पना मिळाल्यानंतर आम्हाला टी-20 विश्वचषकासाठी अनुभवी वेगवान गोलंदाजाची गरज आहे.

युवा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल झपाट्याने बरा होत असून टी-20 विश्वचषकापूर्वी तो टीम इंडियात पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. जर बुमराह टी-20 विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त नसेल तर ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांसाठी शमी टीम इंडिया मध्ये खेळताना दिसू शकतो. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी 11 सप्टेंबरनंतर टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आवेश खानच्या जागी दीपक चहरलाही टीम इंडियात स्थान मिळू शकते.

Web Title: India T20 World Cup Squad Mohammed Shami Return Into Indian Series Against Australia Jasprit Bumrah Place Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..