
राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांवर मोहर उमटवत भारताचा झेंडा दिमाखात फडकवणारा टेबलटेनिसपटू शरथ कमल याने बुधवारी (५ मार्च) निवृत्तीची घोषणा केली.
चेन्नई येथे २५ ते ३० मार्च यादरम्यान जागतिक टेबलटेनिस कंटेडर स्पर्धा पार पडणार आहे. ही स्पर्धा ४२ वर्षीय शरथ कमल याच्या कारकीर्दीतील अखेरची व्यावसायिक स्पर्धा असणार आहे. शरथने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली.