
Steve Smith Retirement: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने बुधवारी (५ मार्च) वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मंगळवारी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला भारताविरुद्ध ४ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर ऑस्ट्रेलियाचे या स्पर्धेतील आव्हानही संपले.
या स्पर्धेत स्मिथने नियमित कर्णधार पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया संघाने नेतृत्व केले होते. पण ऑस्ट्रेलियाचे आव्हान उपांत्य सामन्यानंतरच संपुष्टात आले. यानंतर स्मिथने वनडेतून निवृत्ती जाहीर केली. पण त्याने कसोटी आणि टी२० क्रिकेटमध्ये सक्रिय असल्याचे सांगितले आहे.