Doping
sakal
नवी दिल्ली - भारतामध्ये डोपिंग अर्थातच उत्तेजक सेवनांचे प्रमाण अधिक आहे. याचा फटका भारताला जागतिक स्तरावरील क्रीडा क्षेत्रामध्ये बसत आहे. आता जागतिक ॲथलेटिक्स संघटनेकडून नियुक्त करण्यात आलेल्या स्वतंत्र डोपिंगविरोधी संस्थेच्या ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट (एआययू) यांच्या वतीने जून महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या डोपिंगमधील दोषींच्या आकडेवारीत भारत १६२ गुन्ह्यांसह पहिल्या स्थानावर आहे. ही बाब गंभीर आहे.