esakal | विराटसह मुंबईतील खेळाडूंचे वर्क फ्रॉम होम
sakal

बोलून बातमी शोधा

विराटसह मुंबईतील खेळाडूंचे 'वर्क फ्रॉम होम'

विराटसह मुंबईतील खेळाडूंचे 'वर्क फ्रॉम होम'

sakal_logo
By
नामदेव कुंभार

India tour of england 2021 : इंग्लड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय खेळाडूंचे विलगीकरण कधीच सुरु झाले आहे. मुख्य मार्गदर्शक रवी शास्त्री यांच्यासह मुंबईत राहणाऱ्या खेळाडूंचा अपवाद होता. मात्र, आता त्यांचाही बायोबबलमध्ये समावेश झाला आहे. दौऱ्यावर निघण्यापूर्वी तंदुरुस्ती कायम ठेवण्यासाठी विराट आणि कंपनीला हॉटेल रुममध्ये वर्कआऊट करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. (india tour of england 2021 virat kohli rohit sharma and ajinkya rahane home quarantine)

विराट कोहली, रोहित शर्मा, अंजिक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर हे मुंबईत राहणारे खेळाडू आहेत. गेल्या सोमवारपासून मुंबईबाहेरील खेळाडूंसाठीचे 14 दिवसांचे विलगीकरण सुरु झाले आहे. मुंबईतील खेळाडूंना जर आठवड्यानंतर विलगीकरण सुरु करायचे असेल तर त्यांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. (मुंबईसाठी विमानप्रवास करणार नसल्यामुळे हा अपवाद होता.)

हेही वाचा: WTC Final कोण जिंकणार? रिचर्ड हेडलींचं भाकीत

कर्णधार विराट कोहली याच्यासह रवी शास्त्री यांचेही विलगीकरण सुरु झाले आहे. परंतु, ते पुढील सात दिवस अगोदरपसून विलगीकरणात असणाऱ्या खेळाडूंना प्रत्यक्ष भेटू शकणार नाहीत. दोन जून 2021 रोजी सर्व खेळाडू एकत्र येऊन लंडनला रवाना होतील. विलगीकरणाच्या एकांताचा खेळाडूंना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी बीसीसीआयने तयारी केली आहे. खेळाडूंसाठी हॉटेलच्या रुममध्ये वर्कआऊटची साधने ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व खेळाडू आपल्या नित्याचा व्यायाम करु शकतील. यामध्ये वर्कआऊट सायकल, डंबेल्स, लोखंडी बार आणि प्लेट्स या साहित्यांचा समावेश आहे.