Hardik Pandya: पांड्यामुळं व्यंकटेश अय्यरचे करिअर झाले बाद? बंद झाले टीम इंडियाचे दार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hardik Pandya

Hardik Pandya: पांड्यामुळं व्यंकटेश अय्यरचे करिअर झाले बाद? बंद झाले टीम इंडियाचे दार

टी 20 वर्ल्डकपनंतर टीम इंडिया आता न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. याची तयारी सुरू आहे. या दौऱ्यासाठी संघातील अनेक खेळाडून न्यूझीलंडला पोहचले आहेत. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या टी-20 संघाची जबाबदारी सांभाळणार आहे. अशातच व्यंकटेश अय्यरच्या नावाची चर्चा रंगली आहे. (India tour of NZ Hardik Pandya Venkatesh Iyer Team India)

न्यूझीलंड दौऱ्यासाठी युवा ऑलराउंडर व्यंकटेश अय्यरला संघातून वगळण्यात आलं आहे. आयपीएल 2022 पासून व्यंकटेश अय्यरने टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही. व्यंकटेश अय्यर हा देखील हार्दिक पांड्यासारख्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो, मात्र हार्दिक पांड्याच्या शानदार खेळामुळे त्याला संघात संधी मिळत नाहीये.

हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टी-20 विश्वचषक 2021 पासून टीम इंडियातून बाहेर होता. त्यावेळी हार्दिक पांड्याच्या जागी व्यंकटेश अय्यरला संधी दिली. व्यंकटेश अय्यरने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात पदार्पण केले, पण हार्दिक पांड्या संघात आल्यापासून त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

टॅग्स :Team Indiahardik pandya