esakal | SL vs IND : आधी मॅचच्या तारखा बदलल्या आता वेळ!
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

SL vs IND : आधी मॅचच्या तारखा बदलल्या आता वेळ!

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. श्रीलंकेच्या ताफ्यातील काही स्टाफ सदस्य आणि खेळाडूंचे कोरोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे वनडे आणि टी-20 मालिकेच्या वेळातपत्रकामध्ये काही दिवसांपूर्वीच बदल करण्यात आला. 13 जुलै पासून सुरु होणारी वनडे मालिका 18 जुलैपासून नियोजित आहे. कोणत्याही परिस्थितीत हा दौरा पार पाडण्याच्या उद्देशाने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने मालिकेसाठी दोन संघ निवडले आहेत. दोन्ही संघ वेगवेगळ्या ठिकाणी बायोबबलमध्ये आहेत. (India tour of Sri Lanka 2021 SL vs IND ODI And Series Matches Start Timing Changed)

18 जुलैपासून या मालिकेला सुरुवात व्हावी, यासाठी श्रीलंकन बोर्डाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. तारखांमध्ये झालेल्या बदलानंतर आता वेळेतही थोडासा बदल करण्यात आलाय. दुपारी 3 वाजता सुरु होणारे सामने आता अर्धा तास लवकर म्हणजे 2.30 वाजता सुरु होतील. टी-20 सामन्यांची मालिका सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरु होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील सर्व सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.

हेही वाचा: EURO 2020 : 'गोल्डन बूट' लाडक्या रोनाल्डोचाच!

एका बाजूला श्रीलंकन ताफ्यात कोरोनामुळे खळबळ माजली असताना दुसऱ्या बाजूला भारतीय संघ कसून सराव करताना दिसतोय. भारतीय संघाने आपापल्यात दोन सराव सामने खेळले आहेत. सोमवारी देखील धवनच्या नेतृत्वाखालील संघाने नेटमध्ये कसून सराव केला. संघ राहुल द्रविडच्या अंडर असल्यामुळे सरावात कोणत्याही प्रकारची कसर दिसत नाही. या मालिकेत नवोदित खेळाडूंच्या कामगिरीसोबतच राहुल द्रविडच्या कोचिंगवरही सर्वांच्या नजरा असतील.

हेही वाचा: ICC ट्रॉफी सोडा IPL ही जिंकली नाही; विराट नेतृत्वावर रैनाचे बोल

श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाचे सुधारित वेळापत्रक

वनडे मालिका

पहिला सामना : 18 जुलै

दुसरा सामना : 20 जुलै

तिसरा सामना : 23 जुलै

टी-20 मालिका

पहिला टी-20 सामना : 25 जुलै

दुसरा टी-20 सामना : 27 जुलै

तिसरा टी-20 सामना : 29 जुलै

loading image