WI vs IND India squad : निवडसमितीची महत्वपूर्ण बैठक... रोहितबाबत होणार आजच निर्णय?

Rohit Sharma
Rohit Sharmasakal

WI vs IND India squad selection : भारतीय संघ येत्या 12 जुलैपासून वेस्ट इंडीज दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यावर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार आणि युवा खेळाडूंना संधी मिळणार अशी चर्चा सुरू होती. भारताने WTC Final हरल्यानंतर रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा अशा वरिष्ठ खेळाडूंना संघातून नारळ मिळणार अशी देखील चर्चा सुरू आहे. त्यामुळे वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाच्या निवडीवर सर्वांचेच लक्ष आहे.

Rohit Sharma
Virender Sehwag : निवडसमिती अध्यक्षपदाची ऑफर... काय म्हणाला विरेंद्र सेहवाग?

मिळालेल्या माहितीनुसार आज बीसीसीआयच्या निवडसमितीची बैठक होत आहे. त्यामुळे आज वेस्ट इंडीज दौऱ्यावरील भारतीय संघाची घोषणा होऊ शकते. रोहितला कसोटीसाठी विश्रांती देण्यात येईल असे बोलले जात होते मात्र बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रोहित शर्मा हा वेस्ट इंडीज दौऱ्यावरील कोसटी मालिका खेळणार असल्याचे सांगितले होते.

Rohit Sharma
PM Narendra Modi In USA : युएसए संघांचा चांगला प्रयत्न... क्रिकेटवरून नरेंद्र मोदींची व्हाईट हाऊसमध्ये टोलेबाजी

केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह हे दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध असणार नाहीत. दुसरीकडे चेतेश्वर पुजारा देखील संघातील जागा राखू शकतो असा अंदाज आहे. जरी पुजाराला संघात स्थान मिळाले तरी निवडसमिती मुंबईच्या सर्फराज खानला कसोटी संघात स्थान देण्यास उत्सुक आहे. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत.

Rohit Sharma
Olympic Day 2023 : मॅरेथॉन चौकात उभारणार कविता राऊतचे पहिले शिल्प!

वेस्ट इंडीज दौऱ्यावर भारतीय संघ दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा कसोटी आणि वनडे संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे. तर टी 20 मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माला नेहमीप्रमाणे विश्रांती देण्यात येईल. हार्दिक पांड्या भारताचा नव्या दमाच्या टी 20 संघाचे नेतृत्व करेल.

- शुभमन गिल टी 20 मालिका खेळण्याची शक्यता कमी आहे. आशिया कप आणि वनडे वर्ल्डकपचा विचार करून त्याला वर्कलोड मॅनेजमेंट अंतर्गत विश्रांती मिळू शकते.

- कसोटीत सर्फराज खान, मुकेश कुमार यांना संधी मिळेल. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्याबाबतीत रोटेशन पॉलिसी अवलंबील जाऊ शकते.

- उमेश यादवचा संघात समावेश होईल की नाही याबाबत साशंकता आहे. जयदेव उनाडकटला या दौऱ्यावर अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळेल अशी आशा आहे.

- इशान किशन हा केएस भरतसोबत सध्या एनसीएमध्ये ट्रेनिंग करत आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यावर किशनला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com