ashasvi Jaiswal Practices Ahead of IND vs AUS 2nd ODI
esakal
ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना उद्या म्हणजे गुरुवारी एडिलेड येथे होणार आहे. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकायची असेल तर या सामान्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने भारतीय संघाने सरावही सुरु केला आहे. एडिलेडमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी नेटमध्ये घाम गाळला.