India vs Australia 2nd ODI 2025
esakal
पावसाचा वारंवार व्यत्यय, त्यामुळे फलंदाजीची विस्कटलेली घडी, यामुळे पहिल्या सामन्यात पराभवाची चव चाखावी लागणारा भारतीय संघ गुरुवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात तरी विजयाचे फटाके फोडणार का, याची उत्सुकता असेल. रोहित शर्मा आणि विराट कोहली केंद्रस्थानी असलेल्या भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी होत आहे. एकीकडे फलंदाजी सुधारणा करण्याचे आव्हान असताना मालिकेतील आव्हानही कायम ठेवण्याची जबाबदारी नवोदित कर्णधार शुभमन गिलवर असणार आहे.