Indian Players in Narsimha Temple: एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा नुकतीच भारतात पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने होते. या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
या मालिकेचा पहिला सामना गुरुवारी (दि. २३ नोव्हेंबर) विशाखापट्टणम या ठिकाणी खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी भारतीय खेळाडूंनी देवदर्शन घेतलं. भारतीय खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा यांनी विशाखापट्टणम या ठिकाणी असलेल्या सिम्हाचलम श्री लक्ष्मी नरसिम्हा स्वामी मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रार्थनाही केली. याचा व्हिडीओ एनएनआयने शेअर केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये एकूण ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व स्फोटक खेळाडू सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर असणार आहे. त्याला एकदिवसीय विश्वचषकात फारसा प्रभाव टाकता आला नव्हता.
मात्र, टी-२० हा त्याचा आवडता फॉर्मॅट आहे. त्यामुळे त्याच्या प्रदर्शनावर सर्वाचं लक्ष असणार आहे. या मालिकेत महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड याच्यावर उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी धमाकेदार कामगिरी केली होती. (Latest Marathi News)
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग,अक्षर पटेल, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार (श्रेयस अय्यर अखेरच्या दोन सामन्यांसाठी)
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), रॉन हार्देई, जेसन बेहर्नड्रॉफ, सिन अॅबॉट, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जॉस इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव स्मिथ, मार्कस स्टॉयनिस केन रिचर्डसन, अॅडम झॅम्पा. (Latest Marathi News)
सामन्याची वेळ: सायंकाळी ७ पासून
थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.