Ind vs Aus Final : ऑस्ट्रेलियाचा 'सिक्सर'! मोदी स्टेडियमवर भारताचे स्वप्न भंगले... वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव

Ind vs Aus Final : ऑस्ट्रेलियाचा 'सिक्सर'! मोदी स्टेडियमवर भारताचे स्वप्न भंगले... वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव

India vs Australia World Cup 2023 Final Match Updates : करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला आहे. वर्ल्ड कप-2023 च्या फायनलमध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा 6 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाला तब्बल 12 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याची संधी होती, मात्र ती हुकली. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली आहे.

1987 मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर कब्जा केला होता. यानंतर ती 1999, 2003, 2007, 2015 मध्ये चॅम्पियन बनली होती.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित असताना टीम इंडियाने 50 षटकांत 240 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट गमावत 241 धावा करत सामना जिंकला. कांगारू संघासाठी ट्रॅव्हिस हेडने 141 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. लॅबुशेनने नाबाद 58 धावा केल्या. मिचेल मार्श 15 धावा केल्यानंतर, डेव्हिड वॉर्नर सात धावा करून, स्टीव्ह स्मिथ चार धावा करून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 2 धावा केल्या.

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ 240 धावांत ऑलआऊट झाला आहे. कांगारू संघाने विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 आणि विराट कोहलीने 54 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 47 आणि सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. कुलदीप यादवने 10 धावांचे योगदान दिले.

या पाच खेळाडूंशिवाय कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही. रवींद्र जडेजा नऊ, मोहम्मद शमी सहा, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल प्रत्येकी चार धावा करून बाद झाले. जसप्रीत बुमराहला एकच धाव करता आली. मोहम्मद सिराज नऊ धावा करून नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना प्रत्येकी दोन यश मिळाले.

फायनलमध्ये भारताविरुद्ध हेडने ठोकले शतक, टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार

ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने 34व्या षटकात कुलदीप यादवच्या पाचव्या चेंडूवर एक धाव घेत आपले शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाने 34 षटकात 3 बाद 185 धावा केल्या आहेत. हेड 100 आणि मार्नस लॅबुशेन 41 धावांवर नाबाद आहेत.

हेडने वाढवली टीम इंडियाची डोकेदुखी! लॅबुशेनसोबत शतकी भागीदारी

ऑस्ट्रेलियाने 28 षटकात 3 विकेट गमावत 162 धावा केल्या आहेत. ट्रॅव्हिस हेड 84 आणि मार्नस लॅबुशेन 34 धावांवर नाबाद आहेत. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. भारताला सामन्यात टिकायचे असेल तर त्याला कोणत्याही किंमतीवर विकेट्स काढाव्या लागतील.

हेड अन् लॅबुशेनने सांभाळली कांगारूंची धुरा

ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी मिळून ऑस्ट्रेलियन संघाची धुरा सांभाळली आहे. दोघेही सावधपणे खेळत आहे. आणि हळूहळू ऑस्ट्रेलियाला लक्ष्याच्या दिशेने नेत आहेत. 17 षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 93/3 आहे.

तीन विकेट पडली पण... दहा ओव्हरमध्ये कांगारूंने चांगलीच धुतली

ऑस्ट्रेलियाच्या डावातील 10 षटके संपली आहेत. आणि कांगारूंच्या तीन विकेट पडली आहेत. पण त्याने 60 धावा केल्या आहे. ट्रॅव्हिस हेड 19 धावांवर नाबाद आहे. मार्नस लॅबुशेन खाते उघडू शकला नाही. लवकरात लवकर आणखी एक-दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियावर दडपण आणण्याचा संघाची नजर असले.

शमीनंतर बुमराहचा कहर! डेव्हिड वॉर्नरनंतर मिचेल मार्शची पडली विकेट

मिचेल मार्श आऊट झाला आहे. बुमराहने पाचव्या षटकातील तिसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. आणि मार्शच्या बॅटला कट लागला आणि चेंडू यष्टिरक्षक राहुलच्या हातात गेला. राहुलने झेल घेण्यात कोणतीही चूक केली नाही.

मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नरला केलं आऊट

भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू झाला आहे. जसप्रीत बुमराहने भारताकडून गोलंदाजीची सुरुवात केली. बुमराहचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता जो वॉर्नरच्या बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला. पण चेंडू कोहली आणि गिल यांच्या मधून गेला.

त्यानंतर मोहम्मद शमीने भारताला पहिले यश मिळवून दिले. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने डेव्हिड वॉर्नरला आऊट केले. तीन चेंडूत सात धावा करून वॉर्नर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचे ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श क्रीजवर आहेत.

खेळपट्टीने बदलले रंग अन् वर्ल्ड कपमध्ये भारत पहिल्यांदाच ऑल-आऊट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ 240 धावांत ऑलआऊट झाला आहे.

भारताने गमावली नववी विकेट, सुर्या आऊट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताने नऊ विकेट्स गमावल्या आहेत. जोश हेझलवूडने सूर्यकुमार यादवला आऊट केले. सूर्याने 28 चेंडूत 18 धावा केल्या.

फायनलमध्ये अडचणीत सापडली टीम इंडिया! तीन षटकात पडल्या तीन विकेट

जसप्रीत बुमराहही बॅटने काही करू शकला नाही. ४५व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अॅडम झाम्पाने त्याला एलबीडब्ल्यू केले. भारताने 46 षटकात आठ विकेट गमावत 221 धावा केल्या.

स्टार्कने भारताला दिला आणखी धक्का! राहुलनंतर मोहम्मद शमीही आऊट

भारताची सातवी विकेट मोहम्मद शमीच्या रूपाने पडली. शमीने 10 चेंडूत 6 धावा जोडल्या. 44व्या षटकात स्टार्कने त्याला आपला शिकार बनवले.

स्टार्कने भारताला दिला मोठा धक्का! राहुलला पाठवले पॅव्हेलियनमध्ये

मिचेल स्टार्कने 42 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर केएल राहुलला आऊट केले. यासह भारताची सहावी विकेट पडली.

निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये! वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची अवस्था खराब

भारतीय संघाचा निम्मा संघ 178 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. जोश हेझलवूडने रवींद्र जडेजाला 22 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. आता सूर्यकुमार यादव लोकेश राहुलसोबत क्रीजवर आहे.

अर्धशतक झळकावल्यानंतर राहुल भक्कम आहे आणि भारताला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. 37 षटकांनंतर भारताची धावसंख्या 179/5 आहे.

फायनलमध्ये भारताला मोठा धक्का! कर्णधारने 'किंग' कोहलीला केलं 'क्लीन बोल्ड'

विराट कोहली 29व्या षटकात आऊट झाला आहे. त्याच्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्सने त्याला क्लीन बोल्ड केले. कोहलीने 63 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले.

Ind vs Aus Live Score Final : 'किंग' कोहलीने फायनलमध्ये ठोकले अर्धशतक!

विराट कोहलीने अंतिम फेरीत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. हे त्याचे वनडेतील 72 वे अर्धशतक आहे. विराटने सलग पाचव्या डावात 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याने ही कामगिरी केली होती.

कोहली-राहुलने सांभाळली टीम इंडियाची धूरा!

भारताचा धावांचा वेग थोडा मंदावला आहे. भारताने 17व्या आणि 18व्या षटकात प्रत्येकी फक्त तीन धावा जोडल्या. टीम इंडियाने शतकी खेळी केली आहे. 20 षटकानंतर 115 धावा पूर्ण केल्या. कोहली 34 आणि राहुल 10 धावांवर खेळत आहेत.

आक्रमक सुरुवात नंतर टीम इंडिया बॅकफूटवर! कर्णधार रोहितनंतर श्रेयस अय्यर आऊट

आक्रमक सुरुवात नंतर टीम इंडिया बॅकफूटवर गेली आहे. कर्णधार रोहित शर्मा 47 धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरही जास्त वेळ विकेटवर राहू शकला नाही आणि चार धावा करून बाद झाला.

भारताने 10.2 षटकांनंतर 3 विकेट गमावून 81 धावा केल्या आहेत.

अहमदाबादमध्ये वादळ शांत! कर्णधार पुन्हा एकदा 47 वर आऊट

रोहित शर्माच्या रूपाने भारताला दुसरा धक्का बसला आहे. 10व्या षटकातील ग्लेन मॅक्सवेलच्या चौथ्या षटकात तो बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर क्रीझवर आला आहे. भारताने 10 षटकात 2 बाद 80 धावा केल्या आहेत. विराट कोहली 23 आणि श्रेयस अय्यर चार धावांवर नाबाद आहे.

Ind vs Aus Live Score Final : 4,4,4...विराट कोहली 'चौकार'ची हॅट्रिक! टीम इंडिया 50 पार

भारताच्या डावाची सात षटके संपली आहेत. टीम इंडियाने एका विकेटवर 54 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने सातव्या षटकात मिचेल स्टार्कच्या सलग तीन चेंडूंवर तीन चौकार ठोकले. रोहित शर्मा 22 चेंडूत 33 आणि विराट 13 चेंडूत 16 धावा करून नाबाद आहे.

फायनलमध्ये भारताला पहिला धक्का! आक्रमक सुरुवातनंतर गिल तंबुत

भारताला पहिला धक्का शुबमन गिलच्या रूपाने बसला आहे. मिचेल स्टार्कच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. त्याने 7 चेंडूत 4 धावा केल्या. आता विराट कोहली क्रीझवर आला आहे.

कर्णधार रोहितने फायनलमध्ये केली आक्रमक सुरुवात! 2 षटकात मारले सलग 2 चौकार अन्...

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने जोश हेझलवूडच्या पहिल्याच षटकात दोन चौकार मारले. आणि भारताला चांगली सुरूवात करून दिली.

भारताच्या डावाला सुरुवात

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताच्या डावाला सुरुवात झाली आहे. कर्णधार रोहित शर्मासोबत शुभमन गिल क्रीजवर आहे. मिचेल स्टार्कने पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माविरुद्ध अपील केले. मात्र, पंचांनी त्याचे अपील फेटाळून लावले. टीम इंडियाने एका षटकात कोणतेही नुकसान न करता 3 धावा केल्या आहेत.

दोन्ही संघांची ही आहे प्लेइंग-11

भारत (प्लेइंग इलेव्हन ): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन) : ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (क), अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.

फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक!

अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, त्याने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. आणि मला प्रथम फलंदाजी करायची होती.

ऑस्ट्रेलियन संघातही कोणताही बदल झालेला नाही.

पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाला वर्ल्ड कप फायनलसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने ट्विटरवर लिहिले, “टीम इंडियाला शुभेच्छा. 140 कोटी भारतीय तुम्हाला प्रोत्साहन देत आहेत.

स्टेडियमबाहेर चाहत्यांची गर्दी! फायनल पाहण्यासाठी क्रिकेटचा देव सचिन पोहोचला अहमदाबादला

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादला पोहोचला आहे. अंतिम सामना दुपारी सुरू होणार होता, मात्र नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर चाहत्यांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. स्टेडियममध्ये 1.25 लाखांहून अधिक प्रेक्षक पोहोचण्याची अपेक्षा आहे.

वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी भारत-ऑस्ट्रेलियात 'दंगल', जाणून घ्या मॅचदरम्यान काय होणार?

वर्ल्ड कप 2023 च्या फायनल दरम्यान अनेक रंगारंग कार्यक्रम होणार आहेत. दुपारी 1.30 वाजता सुरू होईल.

1:35 PM : 10 मिनिटांचा एअर शो असणार आहे, जो भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण अॅक्रोबॅटिक टीमद्वारे सादर केला जाईल.

5:30 PM : पहिली इनिंग संपल्यानंतर वर्ल्ड कप जिंकणाऱ्या माजी कर्णधारांचा गौरव करण्यात येणार आहे. बीसीसीआय या सर्वांना खास ब्लेझर देऊन सन्मानित करेल. यावेळी, प्रीतमचा लाइव्ह कॉन्सर्ट होईल, जो 500 हून अधिक नर्तकांसह 'जश्न जश्न बोले' वर्ल्ड कप थीम सॉंगवर सादर करेल.

8:30 PM: दुसऱ्या डावाच्या ड्रिंक्स ब्रेक दरम्यान लाइट आणि लेझर शो होईल.

सामना संपल्यानंतर : अंतिम फेरीत जिंकणाऱ्या संघाला वर्ल्ड कप ट्रॉफी दिली जाईल. यावेळी पहिल्यांदाच रात्रीच्या मोकळ्या आकाशात १२०० ड्रोन स्टंट करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com