Ind vs Aus ODI : अय्यरची तंदुरुस्ती, सूर्याचा फॉर्म अन्... पत्ते राखून ठेवत भारतीय संघाचा वर्ल्डकपच्या तयारीवर अखेरचा हात

Ind vs Aus ODI : अय्यरची तंदुरुस्ती, सूर्याचा फॉर्म अन्... पत्ते राखून ठेवत भारतीय संघाचा वर्ल्डकपच्या तयारीवर अखेरचा हात

India vs Australia ODI Series 2023 : आजपासून सुरू होणारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीवर अखेरचा हात फिरवण्यासारखी आहे. भारताने प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिल्यामुळे दुसऱ्या फळीच्या खेळाडूंना जोखता येणार आहे.

आशिया करंडक स्पर्धा जिंकून भारतीयांनी आत्मविश्वास आणि लय मिळवलेली आहे; मात्र एक-दोन रकाने भरायचे शिल्लक आहेत. त्यात श्रेयस अय्यरची तंदुरुस्ती, सूर्यकुमारचा फॉर्म आणि आत्ता विश्वकरंडक संघात नसला, तरी अश्विन एकदिवसीय सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे निवड समिती तसेच संघ व्यवस्थापनाचे लक्ष असणार आहे.

Ind vs Aus ODI : अय्यरची तंदुरुस्ती, सूर्याचा फॉर्म अन्... पत्ते राखून ठेवत भारतीय संघाचा वर्ल्डकपच्या तयारीवर अखेरचा हात
IND vs AUS India Playing 11 : तब्बल 21 महिन्यांनी अश्विन वनडे संघात परतणार; ऑस्ट्रेलियाविरूद्ध अशी असणार प्लेईंग 11

दुखापतीमुळे मोठ्या विश्रांतीनंतर अय्यरबरोबर केएल राहुल संघात परतला. त्याने तंदुरुस्तीसह फॉर्मही सिद्ध केला आणि आता तो रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे; मात्र अय्यर तंदुरुस्तीच्या पातळीवर गटांगळ्या खात आहे. आता तो तंदुरुस्त झाला आहे आणि आजच्या सामन्यात खेळेल, असे सांगण्यात येत आहे. विश्वकरंडक स्पर्धेस आता मोजकेच दिवस शिल्लक असल्यामुळे अय्यरला दोन्ही आघाड्यांवर आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागणार आहे.

एकदिवसीय प्रकारही ट्वेन्टी-२० प्रमाणे खेळत असलेल्या सूर्यकुमारची याबाबत कानउघाडणी करूनही तो विकेट बहाल करून स्वतःला अडचणीत आणत आहे. तिसऱ्या सामन्यात विराट कोहली परतणार असल्यामुळे सूर्यकुमारसाठी पुढचे दोन सामने अखेरच्या संधीसारखेच असणार आहे.

Ind vs Aus ODI : अय्यरची तंदुरुस्ती, सूर्याचा फॉर्म अन्... पत्ते राखून ठेवत भारतीय संघाचा वर्ल्डकपच्या तयारीवर अखेरचा हात
IND vs AUS 1st ODI : ऑस्ट्रेलियाने केली कॉपी; पहिल्या वनडेत भारताचीच रणनिती अवलंबणार

पत्ते राखून ठेवले

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी निवड समितीने हुशारीने संघनिवड केली आहे. याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वकरंडक स्पर्धेतील सलामीची लढत खेळायची आहे. त्यामुळे भारतीय संघ हातचे राखूनच आपले पत्ते उघड करेल. कुलदीप यादवला दिलेली पूर्ण विश्रांती हा त्यातलाच भाग आहे.

बुमरा-सिराज... एकाला विश्रांती?

जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश असला, तरी दोघांना एकत्रित खेळवले जाण्याची शक्यता कमी आहे. मोहम्मद शमीला पुरेशी संधी मिळालेली नाही. त्यामुळे तो पुढचे दोन सामने खेळणार, हे निश्चित आहे. आशिया करंडक अंतिम सामन्यात श्रीलंकेचे कंबरडे मोडणाऱ्या सिराजला लय कायम ठेवण्यासाठी कदाचित उद्या खेळवले जाऊ शकते. त्यामुळे शमी, सिराज, प्रसिद्धकृष्णा आणि शार्दुल असे चार वेगवान गोलंदाज खेळतील आणि फिरकीसाठी अश्विन या दोघांचीही चाचणी केली जाईल.

ऑस्ट्रेलियासाठी फॉर्मपेक्षा खेळाडूंची तंदुरुस्ती तपासणे हे आव्हान असणार आहे. कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीनंतर खेळणार आहे. स्टीव स्मिथचीही तीच परिस्थिती आहे; मात्र मिशेल स्टार्क आणि जोश हॅझलवूड पहिले दोन सामने खेळू शकणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

ठिकाण ः मोहाली वेळ ः दुपारी १.३० पासून थेट प्रक्षेपण ः जिओ सिनेमा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com