IND vs AUS: हैदराबाद T20 सामन्याच्या तिकीट विक्रीत काळाबाजार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील निर्णायक सामना हैदराबादमध्ये खेळल्या जाणार आहे.
India-Australia T20 match tickets hyderabad
India-Australia T20 match tickets hyderabadsakal

India-Australia T20 match tickets hyderabad : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना हैदराबादमध्ये खेळल्या जाणार आहे. रविवारी 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामना होण्याआधी तिकीट विक्री मध्ये काळाबाजार झाला अशा बातम्या आल्या होत्या. त्यानंतर तिकीट विक्रीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले. आता हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांनी आपली बाजू मांडली आहे.

India-Australia T20 match tickets hyderabad
Rahul Dravid : नागपूर... पाऊस... अन् सासूरवाडीवरून जाफरने राहुल द्रविडला काढला चिमटा

सिकंदराबाद येथील जिमखाना मैदानावर तिकीट विक्रीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान अनेक क्रिकेट चाहते जखमी झाले. आता या घटनेवर भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन म्हणाला की, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने काहीही चुकीचे केलेले नाही. या घटनेबद्दल त्यांनी शोकही व्यक्त केला. राज्य क्रिकेट असोसिएशनही जखमींना मदत करेल, असेही अझरुद्दीने सांगितले.

India-Australia T20 match tickets hyderabad
Dinesh Karthik : 2 बाॅलमध्येच संपवली मॅच; परफेक्ट फिनिशर म्हणाला, मी कोणतंही श्रेय...

तिकीट विक्रीत काळाबाजार यावर बोलताना एचसीएचे अध्यक्ष अझरुद्दीनने सांगितले की, एका कंपनीला या सामन्याची ऑनलाइन आणि ऑफलाईन तिकिटे विकण्याचे काम सोपवण्यात आले आहे. तिकीट विक्रीत मध्ये कोणताही काळा बाजार झालेला नाही. जर कोणी केला असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करू. एखाद्याने ऑनलाइन तिकीट खरेदी करून ते काळा बाजार विकले असेल तर त्याच्याशी एचसीएचा काहीही संबंध नाही.

अझरुद्दीनने गुरुवारची घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले पुढे बोलताना म्हणाला की, हैदराबादला बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक लोक सामना स्टेडियममध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. एचसीएचे सचिव विजयानंद यांनी सांगितले की, तिकीट विक्रीदरम्यान झालेल्या घटनेबाबत युनियनने एक समिती स्थापन केली आहे. जखमींना मदत करेल असे आश्वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com