India vs Australia : भारत-ऑस्ट्रेलिया T20 मालिका कधी सुरू होणार; जाणून घ्या पूर्ण शेड्यूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs Australia t20 series

IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया T20 मालिका कधी सुरू होणार; जाणून घ्या पूर्ण शेड्यूल

India vs Australia T20 Series Schedule : ऑस्ट्रेलियाचा संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी गुरुवारी भारतात दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने मोहालीत तयारी सुरू केली आहे. भारतीय संघ शनिवारपासून येथे तयारीला सुरुवात करणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची मानल्या जात आहे. विशेषतः करून भारतासाठी. आशिया चषक 2022 मधील पराभवानंतर भारतीय संघ या मालिकेत परिपूर्ण प्लेइंग-11 शोधण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा: Impact Player Rule: BCCI नियम बदलणार; सामन्यात आता 11 चा नाही तर 15 चा संघ?

सामने कधी आणि कुठे खेळल्या जाणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर 23 सप्टेंबरला दोन्ही संघ नागपुर मध्ये भिडतील. शेवटचा सामना 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळल्या जाईल. तिन्ही सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील. सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी नाणेफेक होणार आहे.

तुम्हाला सर्व सामने कुठे पाहता येतील?

या तिन्ही सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. या सामन्यांचे थेट प्रवाह Disney+Hotstar अॅपवर पाहता येईल.

  • ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ (India Squad for Australia T20Is) :

    रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.

  • भारत दौऱ्यासाठी निवडण्यात आलेला ऑस्ट्रेलियन संघ :

    एरॉन फिंच (कॅप्टन), पॅट कमिन्स (उप-कर्णधार), टिम डेविड, एस्टन एगर, जोश हेजलवुड, जोस इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिश, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर, एडम जंपा

Web Title: India Vs Australia T20 Series Schedule Venues Squads Live Telecast And Streaming Details Ind Vs Aus Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..