Ind vs Aus : टीम इंडिया नाही जिंकणार टी-20 मालिका? नागपुरातून आली वाईट बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ind vs Aus

Ind vs Aus : टीम इंडिया नाही जिंकणार टी-20 मालिका? नागपुरातून आली वाईट बातमी

Ind vs Aus : भारत आणि विश्वविजेता ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या 23 सप्टेंबरला जामठा स्टेडियमवर दुसरा टी-20 सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने मोहालीचा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही लढत एक प्रकारे 'करो या मरो' अशीच राहणार आहे. त्याआधी नागपुरातून एक वाईट बातमी आली आहे. गुरुवारी पावसामुळे टीम इंडियाचे सराव सत्र रद्द झाले. सामन्याच्या दिवशीही पाऊस पडणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

हेही वाचा: IND vs AUS : बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळणार?, कोण होणार बाहेर

मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 हरल्यानंतर टीम इंडियाला नागपुरात पुनरागमनाची अपेक्षा आहे. पण या आशांना झटका बसताना दिसत आहे. खरंतर दुसऱ्या टी-20 सामन्यावर पावसाची सावट आहे. नागपुरात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे टीम इंडियाचे सराव सत्र रद्द करावे लागले. नागपुरातही असेच वातावरण राहिल्यास दुसरा टी-20 सामना पावसात वाहून जाऊ शकतो. नागपुरात शुक्रवारी पावसाची शक्यता आहे. हवामान संकेतस्थळांनुसार, शुक्रवारी नागपुरात ढगाळ वातावरण असेल आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: IND vs AUS: पावसाचे संकट, तरीही पाटा खेळपट्टीवर गोलंदाजांची अग्निपरीक्षा

टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर नागपूर टी-20 मध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल निश्चित असल्याचे मानले जात आहे. वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह दुसऱ्या टी-20 मध्ये खेळणार असून उमेश यादवला बेंचवर बसवले जाईल. उमेश आगामी विश्वचषक संघाचा भाग नाही, मालिका सुरू होण्यापूर्वी कोविड-19 मुळे प्रभावित झालेल्या मोहम्मद शमीच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यात दुखापत झाल्याने संघाबाहेर आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात तसेच आशिया कपमध्ये तो टीम इंडियाचा भाग नव्हता. एनसीएमध्ये पुनर्वसन पूर्ण केल्यानंतर बुमराह आता संघात परतला आहे.

मोहाली टी-20 मध्ये टीम इंडियाने 208 धावा करूनही सामना गमावला. ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून सामना जिंकला. आता नागपूर टी-20 रद्द झाल्यास टीम इंडियाला हैदराबाद टी-20 मधील मालिका वाचवावी लागणार आहे.

Web Title: India Vs Australia Weather Report Vca Stadium Forecast Report Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..