Ind vs Aus Final: फायनलसाठी नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर नजरा! पिच क्युरेटरने दिली मोठी माहिती

India Vs Australia ICC World Cup 2023 Final
India Vs Australia ICC World Cup 2023 Final

India Vs Australia ICC World Cup 2023 Final : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये येत्या रविवारी एकदिवसीय वर्ल्ड कपचा अंतिम सामना रंगणार आहे. या लढतीत खेळपट्टी कशी असेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बीसीसीआयच्या क्युरेटर्सच्या मार्गदर्शनाखाली अंतिम सामन्याची खेळपट्टी तयार होत आहे. आशीष भौमिक व तापोश चॅटर्जी यांच्या देखरेखीखाली खेळपट्टी तयार केली जात आहे.

दरम्यान, आयसीसीचे खेळपट्टी सल्लागार अँडी एटकिन्सन हे शुक्रवारी दुपारी अहमदाबाद येथे पोहोचले. आता ते आजपासून बीसीसीआयच्या क्युरेटर्ससोबत खेळपट्टीवर काम करणार आहेत. एटकिन्सन यांच्यासोबत आयसीसीचे अधिकारीही आले आहेत.

India Vs Australia ICC World Cup 2023 Final
'अयोध्येतील राम मंदिरात जो हिंदू जाईल तो मुस्लिम म्हणून बाहेर येईल...' पाकिस्तानी खेळाडूचा तो व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, भारत-न्यूझीलंड उपांत्य सामना सुरू होण्याअगोदर खेळपट्टी बदलण्याचा वाद निर्माण झाला होता. ऑस्ट्रेलियातील एका वर्तमानपत्रात या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाले होते. भारतीयांनी जाणीवपूर्वक संथ खेळपट्टी निवडली, असा उल्लेख त्यात होता. त्यामुळे अँडी एटकिन्सन यांच्यावर दबाव वाढला होता. मात्र प्रत्यक्षात असे काही घडले नाही. तसेच बाद फेरीच्या लढतींना नवीन खेळपट्टी असावी असा नियम नसल्याचेही आयसीसीकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले.

India Vs Australia ICC World Cup 2023 Final
Ind vs Aus Final Weather : भारत-ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये कसे असेल हवामान? पाऊस पडला तर काय... समजून घ्या गणित

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या या अंतिम सामन्याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अंतिम सामन्यासाठी नवीन खेळपट्टीचा वापर केला जाईल की आधीच वापरलेल्या खेळपट्टीवर हा सामना होईल हे सध्या स्पष्ट झालेले नाही. पण राज्य संघटनेच्या क्युरेटरच्या म्हणण्यानुसार, काळ्या मातीच्या खेळपट्टीवर जड रोलर्स वापरल्यास, एक संथ फलंदाजीची खेळपट्टी तयार केली जाईल जिथे मोठी धावसंख्या बनवता येईल परंतु फटकेबाजी सातत्याने करता येणार नाही. 315 धावांचा बचाव करता येईल. अशा स्थितीत लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला दुसऱ्या डावात फलंदाजी करणे थोडे कठीण जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com