बांगलादेशच्या फिरकीने पहिल्याच दिवशी नाचवले; पुजारा - अय्यर जोडीने लाज राखली : India Vs Bangladesh 1st Test Day 1 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Vs Bangladesh 1st Test Day 1

BAN vs IND 1st Test : बांगलादेशच्या फिरकीने पहिल्याच दिवशी नाचवले; पुजारा - अय्यर जोडीने लाज राखली

India Vs Bangladesh 1st Test Day 1 : भारताने बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी 6 बाद 278 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून चेतेश्वर पुजाराने 203 चेंडूत 90 धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यर दिवसअखेर 82 धावा करून नाबाद राहिला. ऋषभ पंतनेही 45 चेंडूत 46 धावा ठोकत आपले योगदान दिले. बांगलादेशकडून डावखुरा फुरकी गोलंदाज तैजुल इस्लामने 3 तर मेहदी हसन मिर्झाने 2 विकेट घेत भारताच्या टॉप ऑर्डरला खिंडार पाडले. दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर अक्षर पटेल 14 धावांवर बाद झाला.

हेही वाचा: Virat Kohli : विराट भावा मानलं! खेळाप्रती समर्पण असावं तर विराट सारखं, Photo होतोय व्हायरल

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरूवात खराब झाली. शुभमन गिल आणि केएल राहुल या सलामी जोडीने 41 धावांची भागीदारी रचली खरी मात्र दोघेही सेट झाले आहेत असे वाटत असतानाच तैजुल इस्लामने शुभमन गिलला 20 धावांवर बाद केले. पाठोपाठ केएल राहुल देखील खालेद अहमदच्या गोलंदाजीवर 22 धावा करून बोल्ड झाला. दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांच्याकडून डाव सावरण्याची अपेक्षा होती. मात्र तैजुल इस्लामने विराट कोहलीला उत्कृष्ट फिरकीवर अवघ्या 1 धावेवर पायचीत बाद केले.

भारताची अवस्था 3 बाद 48 धावा अशी झाली असताना ऋषभ पंतला बढती देऊन मैदानावर पाठवण्यात आले. त्या आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी करत भारताचा धावलफल हलता ठेवला. दुसऱ्या बाजूने पुजाराने एक बाजू लावून धरली होती. या दोघांनी उपहारापर्यंत भारताला शतकी मजल मारून दिली. उपहारापूर्वी 30 धावांवर खेळणाऱ्या पंतने उपहारानंतर आक्रमक फटकेबाजी करत 45 चेंडूत 46 धावांपर्यंत मजल मारली.

हेही वाचा: Shreyas Iyer : श्रेयस अय्यरने भारताचा डावही सावरला अन् 2022 ही गाजवलं

यानंतर चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी रचली. पुजारा शतकाच्या जवळ पोहचला असतानाच तैजुल अहमदने त्याला 90 धावांवर बाद केले. दरम्यान आक्रमक फलंदाजी करणारा श्रेयस अय्यर देखील 82 धावांवर पोहचला होता. तो अक्षर पटेलच्या साथीने भागीदारी रचण्याचा प्रयत्न करत असतानाच दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेल 14 धावा करून बाद झाला. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताने 90 षटकात 6 बाद 278 धावा केल्या.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत..