IND vs BAN Playing-11: धवन खेळला तर KL राहुलच काय होणार ? जाणून घेऊया एका क्लिकवर

कर्णधार रोहित शर्मासह शिखर धवन आणि केएल राहुल यांच्यात सलामीवीरासाठी स्पर्धा
IND vs BAN Playing-11
IND vs BAN Playing-11sakal
Updated on

India vs Bangladesh Playing-11 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरु होणार आहे. कर्णधार रोहित शर्मासह शिखर धवन आणि केएल राहुल सलामीवीरासाठी स्पर्धा करत आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय व्यवस्थापनाला आतापासूनच आपला संघ तयार करण्याची तयारी सुरू करायची आहे.

IND vs BAN Playing-11
Pakistan vs England Test : 'रावळपिंडीच्या खेळपट्टीवर 3 ते 10 वर्षांची बंदी...!' चाहते संतापले

काही वर्षांपूर्वी वनडेमध्ये रोहित आणि धवनची जोडी खूप आवडली होती. तथापि यावर्षी खेळल्या गेलेल्या 19 एकदिवसीय सामन्यांमध्ये, धवनने 2016 आणि 2018 दरम्यान 101 च्या तुलनेत 75.11 च्या खराब स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. केएल राहुलने 45 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 85 पेक्षा जास्त आणि सरासरी 45 आहे. जर धवन सामन्यात खेळला तर राहुलला मधल्या फळीत उतरवले जाऊ शकते. त्याने याआधी मधल्या फळीत फलंदाजी केली आहे आणि चमकदार कामगिरी केली आहे.

IND vs BAN Playing-11
FIFA World Cup 2022 : पोलंडविरुद्धच्या सामन्यात फ्रान्सचे पारडे जड

तिसऱ्या क्रमांकासाठी विराट कोहली हा पर्याय आहे. श्रेयस अय्यर हळूहळू चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध करत आहे. पाचव्या क्रमांकावर इशान किशनपेक्षा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला प्राधान्य दिले जाऊ शकते. सहाव्या क्रमांकावर संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत रजत पाटीदार किंवा राहुल त्रिपाठी यांच्यापैकी एकाला स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्रिपाठी गोलंदाजीही करू शकतात. अशा परिस्थितीत त्याला हार्दिक पांड्याला पर्याय म्हणून स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे.

मोहम्मद शमीच्या दुखापतीनंतर संघात समाविष्ट झालेला जम्मू-काश्मीरचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी असणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यातही त्याने दमदार कामगिरी केली होती. मीरपूरची खेळपट्टी थोडी संथ असू शकते. दीपक चहर, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे वेगवान गोलंदाजांमध्ये खेळणे जवळपास निश्चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com