INDvsENG : त्रिकूटानं उडवला धुरळा; इंग्लंडने त्रिशतकीय चॅलेंज परतवलं

India vs England 2nd ODI, Jason Roy, Bairstow, Ben Stokes, England by 6 wkts  Series level
India vs England 2nd ODI, Jason Roy, Bairstow, Ben Stokes, England by 6 wkts Series level
Updated on

'करो वा मरो' लढतीत इंग्लंडच्या संघाने विश्वविजेत्याचा रुबाब दाखवत 337 धावांचे आव्हान परतवून लावत मालिकेत बरोबरी साधली. इंग्लंडने 6 गडी आणि 39 चेंडू राखून सामना जिंकला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली असून आता तिसरा आणि अखेरचा सामना निर्णायक ठरणार आहे.  भारतीय संघाने ठेवलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्ट्रोने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. जेसन रॉय 55 धावा करुन परतल्यानंतर जॉनीने शतक पूर्ण केले. त्याच्या साथीने बेन स्टोक्सने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी 32 चेंडूत 91 धावा कुटल्या. शतकाला अवघी एक धाव कमी असताना बेन स्टोक्स झेलबाद झाला.

भुवीने त्याची विकेट घेतली. जॉनी बेयरस्ट्रो 124 धावा करुन माघारी परतला. आघाडीच्या तिघांनी आक्रमक खेळी करुन टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. कर्णधार जोस बटलरच्या रुपात प्रसिद्ध कृष्णाने सामन्यातील दुसरी विकेट घेतली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जोस बटलरला खातेही उघडता आले नसले तरी त्याच्या नेतृत्वाखालील संघाने विजय नोंदवत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील आव्हान कायम राखले आहे.  

राहुलने भारतीय संघाचा डाव सावरला. या दोघांनी शतकी भागीदारी केली. विराट कोहली 66 धावा करुन परतल्यानंतर लोकेश राहुलने पंतसोबत डावाला आकार दिला. त्याने वनडे कारकिर्दीतील 5 वे शतक पूर्ण केले. 108 धावांवर टॉम कुरेन याने त्याची विकेट घेतली. 40 चेंडूत 77 धावा करणाऱ्या पंतलाही टॉम कुरेन यानेच बाद केले. हार्दिक पांड्याने 16 चेंडूत 35 धावा कुटल्या. तर कृणाल पांड्याने 3 चेंडूत 12 धावा करत टीम इंडियाच्या धावफलकावर 336 धावांपर्यंत पोहचवले. फलंदाजांच्या हिटशोनंतर गोलंदाजांनी खांदे पाडले. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 2 तर भुवीने एक विकेट घेतली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com