IND vs ENG R. Ashwin : दुसरी कसोटी अश्विनसाठी ठरणार अत्यंत महत्वाची; रडारवर असणार कुंबळे अन् चंद्रशेखर

Ravichandran Ashwin Test Record India Vs England : अश्विनला दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक विक्रम मोडण्याच्या संधी आहे.
India Vs England 2nd Test Ravichandran Ashwin Record
India Vs England 2nd Test Ravichandran Ashwin Recordesakal

India Vs England 2nd Test Ravichandran Ashwin Record : विशाखापट्टणम येथे उद्या (दि. 2) भारत आणि इंग्लंड यांच्यामधील दुसरी कसोटी सुरू होणार आहे. पहिल्या कसोटीत भारताचा 28 धावांनी पराभव झाल्यानंतर दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताने कंबर कसली आहे. दुसरी कसोटी ही भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनसाठी खास असणार आहे.

रविचंद्रन अश्विन दुसऱ्या कसोटीत अनेक विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. रविचंद्रन अश्विन हा आपल्या कसोटीतील 500 विकेट्स पूर्ण करण्यापासून फक्त 4 विकेट्स दूर आहे.

India Vs England 2nd Test Ravichandran Ashwin Record
Pro Kabaddi : गतविजेत्या जयपूरचा दणदणीत विजय; अर्जून देसवालने सर्वाधिक १३ गुणांची केली कमाई

अश्विन याचबरोबर अजून एका विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. दुसऱ्या कसोटीत त्याने दोन विकेट्स घेतल्या तर तो भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम बी चंद्रशेखर यांच्या नावावर आहे.

त्यांनी इंग्लंडविरूद्ध 23 सामन्यात 95 विकेट्स घेतल्या आहेत. तर अश्विनने 20 कसोटीत 94 विकेट्स घेतल्या आहेत. जर अश्विनने दुसऱ्या कसोटीत सहा विकेट्स घेतल्या तर तो भारत - इंग्लंड कसोटी सामन्यांमध्ये 100 विकेट्स घेणारा भारताचा पहिला आणि दोन्ही देशांमधला मिळून दुसरा गोलंदाज ठरले.

India Vs England 2nd Test Ravichandran Ashwin Record
Ind Vs Eng : ‘बॅझबॉल’ला चतुराईने रोखावे लागेल; फलंदाजी प्रशिक्षकांनी केली गिल, श्रेयसची पाठराखण

यापूर्वी जेम्स अँडरसनने भारताविरूद्ध कसोटीत 100 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 35 सामन्यात 139 विकेट्स घेतल्या. याचबरोबर अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 500 विकेट्स घेणारा दुसरा खेळाडू ठरेल. तो या बाबतीत अनिल कुंबळेला मागे टाकेल. भारताच्या माजी कर्णधाराने 105 कसोटीत 500 विकेट्सचा टप्पा पार केला होता. अश्विन ही कामगिरी 97 कसोटीतच करण्याची शक्यता आहे.

कसोटीत सर्वात वेगवान 500 विकेट्स घेण्याचा विक्रम हा श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने 87 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली होती.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com