IND vs ENG 3rd Test : राजकोट कसोटीत टाळ्यांच्या गजरात पुजारा मैदानात येणार... SCA दिली माहिती

IND vs ENG 3rd Test Cheteshwar Pujara : सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आपल्या दोन दिग्गज खेळाडूंचा करणार गौरव
IND vs ENG 3rd Test Cheteshwar Pujara
IND vs ENG 3rd Test Cheteshwar Pujaraesakal

IND vs ENG 3rd Test Cheteshwar Pujara : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा राजकोट येथे होत आहे. इंग्लंडविरूद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी नुकतेच बीसीसीआयने संघाची घोषणा केली. दुखापतग्रस्त रविंद्र जडेजा संघात परतला आहे. मात्र तो फिट असेल तरच प्लेईंग 11 मध्ये खेळणार असं स्पष्टपणे बीसीसीआयने सांगितले आहे.

दरम्यान, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या अनुपस्थितीत अनुभवी चेतेश्वर पुजाराला संघात स्थान मिळेल असे वाटत होते. मात्र रणजी ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करून देखील निवडसमितीने त्याच्या निवडीबाबत कानाडोळा केला आहे. जरी चेतेश्वर पुजारा राजकोटवर खेळताना दिसणार नसला तरी तो सामन्याच्या पहिल्या दिवशी नक्की उपस्थित असेल. कारण सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चेतेश्वर पुजारा आणि रविंद्र जडेजाचा गौरव करणार आहे.

IND vs ENG 3rd Test Cheteshwar Pujara
U19 World Cup 2024 Final IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप फायनलमध्ये हरवण्याची संधी, कधी अन् कुठं पाहायचा Live सामना?

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शाह यांनी सांगितले की, 'आम्ही राजकोट स्टेडियमच्या नाव बदण्याच्या सोहळ्यावेळी चेतेश्वर पुजारा आणि रविंद्र जडेजा या दोघांचाही सन्मान करणार आहोत.'

पुजाराने दीर्घ काळ भारतीय क्रिकेट संघाची सेवा केला आहे. तर रविंद्र जडेजा अजूनही भारताकडून खेळतो आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू म्हणून आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे.

जयदेव शाह पुढे म्हणाले की, 'चेतेश्वर पुजारा भारतीय संघात का खेळत नाहीये याबाबत मी जास्त काही सांगू शकत नाही. हा निर्णय संघ व्यवस्थापन आणि निवडसमितीचा असतो. तो भारतीय संघात होता त्यामुळे आम्हाला त्याचा अभिमान आहे. तो संघाबाहेर आहे म्हणून आम्हाला त्याचा अभिमान नाही असं नाही.'

IND vs ENG 3rd Test Cheteshwar Pujara
IPL 2024 LSG Shamar Joseph : ऑस्ट्रेलियात धुमाकूळ घालणारा शामर जोसेफ लखनौ सुपर जायंट्सच्या लागला गळाला

जयदेव शाह पुढे म्हणाले की, 'त्याने 100 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. भारताकडून इतके सामने खेळणे प्रत्येकाला जमतेच असं नाही. तो जर राजकोटवर खेळत असता तर चांगलंच झालं असतं मात्र हा खेळाचाच एक भाग आहे. आपण जी स्वप्नं पाहतो ती प्रत्येक स्वप्नं पूर्ण होतातच असं नाही. त्याने खूप कष्ट केले आहेत. त्याने सौराष्ट्रचा गौरव वाढवला आहे.'

रविंद्र जडेजाबद्दल जयदेव शाह म्हणाले की, 'रविंद्र जडेजा अजूनही सौराष्ट्रचा सन्मान वाढवतोय. तो दुखापतग्रस्त आहे असं मी ऐकलं आहे. याबाबत मला फार काही माहिती नाही. मात्र तो कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मला तशी आशा आहे. आम्ही आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये क्रमांक 1 चा अष्टपैलू खेळाडू झाल्याने त्याचा देखील गौरव करणार आहोत.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com