esakal | VIDEO : भारतीय वंशाच्या फलंदाजाची कमाल; 6 चेंडूत 6 षटकार
sakal

बोलून बातमी शोधा

jaskaran malhotra

VIDEO : भारतीय वंशाच्या फलंदाजाची कमाल; 6 चेंडूत 6 षटकार

sakal_logo
By
सुशांत जाधव

आयपीएल आणि टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच युएईच्या मैदानात युवराज सिंगच्या पराक्रमाची पुनरावृत्ती झाली आहे. भारतीय वंशाच्या जसकरन मल्होत्राने आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात 6 चेंडूत 6 षटकार मारुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मूळ भारतीय वंशाचा असलेला मल्होत्रा अमेरिकेतील टेक्सास येथे वास्तव्यास आहे. अमेरिका आणि पपुआ न्यू गिनी यांच्यातील सामन्यात एका षटकात षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. व्यावसायिक क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 6 षटकार खेचणारा मल्होत्रा हा दहावा फलंदाज ठरलाय.

ओमानच्या अल अमिरातच्या मैदानात पपुआ न्यू गिनी विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात मल्होत्रा 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. अमेरिकेच्या डावातील अखेरच्या षटकात गौडी टोका गोलंदाजी करत होता. या षटकात मल्होत्राने 6 चेंडूत 6 षटकार खेचले. या सामन्यात त्याने 124 चेंडूत नाबाद 173 धावांची खेळी केली. मल्होत्राच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर अमेरिकेने 273 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यू पपुआ गिनीचा संघ 37.1 षटकात 137 धावांत आटोपला. अमेरिकेन हा सामना 134 धावांनी जिंकला.

हेही वाचा: T-20 World Cup : आम्ही नाही जा! राशिद खान रुसला...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकार मारणारा मल्होत्रा चौथा फलंदाज आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्ज (Harschelle Gibbs) (2007) याने वनडेत 6 चेंडूत 6 षटकार मारले होते. भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने (Yuvraj Singh) (2007) इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात षटकाराचा धमाका केला होता. वेस्टइंडिजचा फलंदाद केरॉन पोलार्डने (Kieron Pollard) (2021) आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात अशी कामगिरी करुन दाखवली होती.

हेही वाचा: इशान किशनची 'टीम इंडिया'त निवड; 'या' हॉट मॉडेलची रंगली चर्चा

क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 6 षटकार खेचणारे फलंदाज

गॅरी सोबर्स (1968), रवी शास्त्री (1985), हर्शल गिब्स (2007), युवराज सिंग (2007), रॉस विटेली (2017), हजरतुल्लाह जजई (2018), लियो कार्टर (2020), केरॉन पोलार्ड (2021), थिसारा परेरा (2021)

loading image
go to top