भारत-इंग्लंड पहिला कसोटी सामना; कोहली कोणते पर्याय निवडणार?

आजपासून कसोटी क्रिकेटची रंगत
india vs england
india vs englandsakal

भारताचा (india) इंग्लंड (england) दौरा नेहमी चर्चेचा विषय ठरतो. त्यातून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना अजून उत्सुकता वाढवतो. इंग्लंडचा कप्तान ज्यो रूट भारतात झालेल्या पराभवाचा वचपा काढायला टपून बसला असताना भारतीय कप्तान विराट कोहली (virat kohli)काय पर्याय निवडतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. एकंदरीत ऑलिंपिकची रंगत वाढलेली असताना क्रीडाप्रेमींना उद्यापासून भारत- इंग्लंड कसोटी सामन्याचीही रंगत अनुभता येणार आहे. (India vs England First Test Match)

पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय फलंदाज जिमी अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड जोडीचा सामना कसा करतात, यावर बरेच काही अवलंबून असेल. पहिल्या डावात चांगल्या धावा करायला भारतीय फलंदाजांना याच नामांकित जोडीला काहीसा आक्रमक पवित्रा घेत सामोरे जावे लागेल. अँडरसन - ब्रॉड जोडीला स्विंग गोलंदाजीची लय सापडू नये, याकरिता वेगळ्या योजना आखून त्या अंमलात आणाव्या लागतील. तसेच ज्यो रूटच्या हाताशी बेन स्टोकस् नावाचा हुकमी एक्का नसणार आहे. त्यामुळे याचाच फायदा भारतीय संघाला उचलायचा आहे.

india vs england
Olympics: गुड मॉर्निंग इंडिया; टोकियोत नीरजनं जागवली गोल्डची आस

भारतीय संघाची जडणघडण कशी असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. शुभमन गिलच्या जागी रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार, हा कळीचा मुद्दा असेल. विराट कोहली के. एल. राहुलला पसंती देतो की हनुमा विहारीचा विचार करतो की अभिमन्यू इस्वरनला पदार्पण करायची संधी देतो, हा औत्सुक्याचा विषय आहे. सध्याचा फॉर्म बघता के. एल. राहुलला झुकते माप मिळायची दाट शक्यता वाटते. तसेच ईशांत शर्माच्या अनुभवाला प्राधान्य मिळते, की ऑस्ट्रेलियात जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या सिराजला शमी आणि बुमरासोबत मारा करायला मिळतो, हे बघावे लागेल.

ट्रेंट ब्रिज मैदानावरची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला मदत करत असली, तरी ऑगस्ट महिन्यात सामना होत असल्याने तितका ताजेपणा गवतात असेल असे वाटत नाही. भारतीय फलंदाजीत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेकडून संघ व्यवस्थापनाला काय वेगळ्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करायला हे दोन अनुभवी फलंदाज काय वेगळे करतात, हे बघायचे आहे.

थेट प्रेक्षपण : दुपारी ३.३० पासून

सोनी स्पोर्ट्‌स नेटवर्क

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com