India Vs England : जडेजा-बुमरा-सिराजसारखी जिद्द इतर खेळाडूंकडून अपेक्षित; भारताच्या पराभवाने फार निराश : सौरव गांगुली
India Cricket News : १९३ धावांचे लक्ष्य पार करता आले नाही, याबद्दल माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत वरच्या फळीतील फलंदाजांवर निशाणा साधला.
Sourav Ganguly disappointed after India vs England lossesakal
मुंबई : गेल्या दोन सामन्यांत ज्या प्रकारे आपल्या खेळाडूंनी फलंदाजी केली होती, ते पाहता १९३ धावांचे आव्हान पार करायला हवे होते, परंतु ते शक्य झाले नाही. त्यामुळे मी फार निराश झालो आहे, असे दुःख भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले.