esakal | IND vs ENG 5th Test: हुश्श! टीम इंडियाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

IND vs ENG 5th Test: हुश्श! टीम इंडियाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

sakal_logo
By
सुशांत जाधव

India vs England 5th Test : भारतीय क्रिकेट संघातील स्टाफ सदस्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यावर संकट घोंगावत होते. फिजिओ योगेश परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर टीम इंडियातील खेळाडूंच्या कोरोना चाचणीकडे सर्वांचे लक्ष होते. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील पाचव्या कसोटी सामन्यासंदर्भात काहीच सांगता येत नाही, असे म्हटले होते.

टीम इंडियातील सर्व खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून पाचवा कसोटी सामना नियोजित वेळेनुसार रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना आजपासून मँचेस्टरच्या (Old Trafford, Manchester) मैदानात रंगणार आहे.

हेही वाचा: इशान किशनची 'टीम इंडिया'त निवड; 'या' हॉट मॉडेलची रंगली चर्चा

योगेश परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाच्या ताफ्यात पुन्हा एकदा खळबळ माजली होती. यापूर्वी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली होती. ते क्वारंटाईन असताना टीम इंडियाच्या ताफ्यात आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे टीम इंडिया सरावासाठी मैदानात उतरली नव्हती. सर्व खेळाडूंची गुरुवारी RT-PCR टेस्ट करण्यात आली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्याने या वृत्ताला दुजोरा दिला असून पाचवा कसोटी सामना ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा: T20 World Cup: "रोहित, विराट, धोनी अन् शास्त्री गुरूजी..."

इंग्लंड दौऱ्यातील अखेरच्या टप्प्यात टीम इंडियाच्या 'बायो-बबल'संदर्भात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींसह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांचे कोरोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी रवी शास्त्री यांनी इंग्लंडमधील एका हॉटेलमध्ये पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम घेतला होता. शास्त्रींसह किंग कोहली आणि टीम इंडियातील अन्य काही खेळाडू या कार्यक्रमाला उपस्थितीत होते. 'बायो-बबल'मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयनेही यावर नाराजी व्यक्त केली असून पाचव्या कसोटी सामन्यानंतर यासंदर्भात बीसीसीआय काय करावाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

loading image
go to top