
लॉर्ड्स : भारतीय क्रिकेट संघाला लॉर्ड्स कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले. यजमान इंग्लंड संघाने पाच कसोटी लढतींच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली. या कसोटीत भारतीय संघाने ६३ धावा अवांतर दिल्या. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, अवांतर धावा अधिक प्रमाणात देण्यात आल्या. खेळाच्या याबाबतीत सुधारणा करावी लागणार आहे.