ग्लोव्ह्जला टेप लावून पंतची चिटिंग? जाणून घ्या नियम

रिषभ पंतने केलेली कृती चर्चेचा विषय ठरतीये.
Rishabh Pant
Rishabh Pant Twitter
Updated on

Rishabh Pant Gloves Controversy : हेडिंग्लेच्या मैदानात टीम इंडिया (India Cricket team) चांगलीच अडचणीत आहे. भारतीय संघाचा पहिला डाव दुहेरी धावसंख्येवरच आटोपला. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटच्या शतकी खेळीच्या जोरावर यजमानांनी 345 धावांची आघाडी घेतलीये. ज्या मैदानात भारतीय फलंदाज गडबडले त्या मैदानात इंग्लंडच्या फलंदाजांना तंबूत पाठवण्यासाठी भारतीय गोलंदाजांना आणि फिल्डर्संना चांगलीच मेहनत घ्यावी लागली.

दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांचा दबदबा दिसत असताना रिषभ पंतने भरमैदानात केलेली कृती चर्चेचा विषय ठरतीये. दुसऱ्या दिवशीच्या खेळादरम्यान रिषभ पंत आणि विराट कोहली मैदानातील पंचांशी चर्चा करताना दिसले. या चर्चेमागचं कारण आता समोर आले आहे. सामनाधिकारी एलेक्‍स वार्फ आणि रिचर्ड केटलबरॉ यांनी रिषभ पंतला ग्लोव्ह्जला लावलेला टेप काढायला सांगितला होता.

Rishabh Pant
T20मध्ये महिलेने रचला इतिहास! केला पुरूषांना न जमलेला विक्रम

पंतने ज्या बोटांना आधार मिळावा म्हणून टेप लावला होता ते MCC नियमावलीचे उल्लंघन करणारे होते. मेलबर्न क्रिकेट क्लबच्या नियमावलीतील कलम 27.2 मध्ये यासंदर्भातील नियम अधोरेखित करण्यात आलाय. 27.2.1 मधील नियमालीनुसार, विकेट किपरने ग्लोव्ह्ज घातल्यानंतर अंगठा आणि त्याच्या शेजारील बोटासह अन्य बोटाला आधार देणे अयोग्य आहे.

Rishabh Pant
IND vs ENG : इंजी भाईनं सांगितला 'विराट' दुखापतीचा इलाज

स्काय स्पोर्ट्सवरील कॉमेंट्रीदरम्यान नासीर हुसेन आणि डेविड लॉयड यांनीही याप्रकरणावर आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाले होते. लॉयडनेतर मलानला पुन्हा खेळायला बोलवायला हवं, असे विधान केले होते. पंतने मलानचा घेतलेला कॅच नियमबाह्य होता. टेप काढण्यापूर्वी अनेक चेंडू फेकले होते, असा उल्लेखही लॉयड यांनी कॉमेंट्री दरम्यान केला होता. इंग्लंडच्या पहिल्या डावात पंतने विकेटमागे एकमेव कॅच टिपला. त्याने सिराजच्या गोलंदाजीवर मलानला झेलबाद केले. मलानने 128 चेंडूत 70 धावांची उपयुक्त खेळी केली होती. या विकेटनंतर हा सर्व वादग्रस्त मुद्दा चर्चेत आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com