esakal | VIDEO : हिटमॅननं तोऱ्यात साजरी केली परदेशातील पहिली सेंच्युरी!
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG

VIDEO : हिटमॅननं तोऱ्यात साजरी केली परदेशातील पहिली सेंच्युरी!

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील तिसरा दिवस भारताचा सलामीवीर रोहित शर्माने गाजवला. त्याने परदेशातील मैदानात पहिलं शतक झळकावलं. त्याने खास शतक षटकाराने साजरे केले. कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा रोहितनं षटकाराने शतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले.

42 कसोटी सामन्यातील रोहित शर्माचे हे आठवे शतक ठरले. यापूर्वी रोहितने इंग्लंड विरुद्ध 4 शतके झळकावली होती. पण परदेशात त्याच्या भात्यातून शतकी धमाका पाहायला मिळाला नव्हता. इंग्लंड विरुद्ध पाचव्या शतकासह त्याने ही प्रतिक्षा संपवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इंग्लंडमधील त्याचे हे नववे शतक आहे. टी-20, वनडे आणि कसोटीमध्ये रोहितच्या नावे आता 41 शतकाची नोंद झालीये. इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतकी खेळण्याचा खास विक्रमही रोहितने आपल्या नावे केलाय. रोहितच्या पुढे आता केवळ डॉन ब्रॅडमन आहेत. ज्यांनी 11 शतके झळकावली आहेत.

हेही वाचा: IND vs ENG : टीम इंडिया पिछाडीवरुन धमाका करण्यात माहिर; पण...

2013 नंतर हिटमॅनची खेळी बहरत गेली

2007 मध्ये दक्षिण अफ्रिकेत झालेल्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य असलेला रोहित शर्मा संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसला. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये त्याला संघात स्थान मिळवण्यातही अपयश आले. मात्र 2013 नंतर रोहितची गाडी पुन्हा पटरीवर आली. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्याने मध्यफळीतून ओपनिंगमध्ये बढती मिळवली. अन् त्याच्या भात्यातून धावांची बरसात व्हायला सुरुवात झाली.

मागील इंग्लंड दौऱ्यातील रोहितची सरासरी कामगिरी

57.66 vs इंग्लंड, कसोटी 2021

81.00, वर्ल्ड कप, 2019

77.00 vs इंग्लंड, ODI 2018

68.50 vs इंग्लंड, T20Is 2018

76.00, चॅम्पियन्स ट्रॉफी 2017

loading image
go to top