IND vs ENG 3rd T20 पूर्वी रोहित 'या' खेळाडूला दाखवणार बाहेरचा रस्ता

टीम इंडियासाठी सुर्यकुमार यादव डोकेदुखी ठरत आहे.
IND vs ENG 3rd T20 पूर्वी रोहित 'या' खेळाडूला दाखवणार बाहेरचा रस्ता
Updated on

भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका शानदार पद्धतीने जिंकली. भारताने इंग्लंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामना ४९ धावांनी जिंकला. मात्र, टीम इंडियासाठी सुर्यकुमार यादव डोकेदुखी ठरत आहे. इंग्लंडविरुद्ध त्याने अत्यंत खराब कामगिरी केलीय.(india vs england t20 match suryakumar yadav may replace by shreyas iyer)

IND vs ENG 3rd T20 पूर्वी रोहित 'या' खेळाडूला दाखवणार बाहेरचा रस्ता
राजकारण रोजचंच आहे पण...; संजय राऊतांनी शेअर केला व्हिडीओ

इंग्लंडविरुद्ध सुर्यकुमार यादवची बॅट शांत राहिली. पहिल्या सामन्यात तो ३९ धावांवर बाद झाला तर दुसऱ्या सामन्यात त्याने केवळ १५ धावा केल्या. त्याच्या या खराब प्रदर्शनामुळे तिसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्तता धुसर आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यर संधी देण्यात येणार असल्याची चर्चा क्रिकेट जगतात सुरु आहे.

आयपीएल 2022 च्या मध्यावर सूर्यकुमार यादवला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने आयर्लंड दौऱ्यादरम्यान पुनरागमन केले. मात्र तेथे तो फ्लॉप ठरला. त्यामुळे त्याच्या संघात असण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चौथ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यर हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. असे क्रिकेट जाणकरांचे मत आहे.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकले आहेत. अय्यरकडे विकेटवर टिकून राहण्याची अप्रतिम क्षमता आहे. जेव्हा तो आपल्या लयीत असतो तेव्हा तो कोणत्याही गोलंदाजीच्या आक्रमणाला फाटा देऊ शकतो. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या होत्या. अय्यरने भारताकडून 41 टी-20 सामन्यात 903 धावा केल्या आहेत.

IND vs ENG 3rd T20 पूर्वी रोहित 'या' खेळाडूला दाखवणार बाहेरचा रस्ता
Shahid Afridi : इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाच्या विजयावर आफ्रीदीचं मोठं वक्तव्य

जेव्हापासून सुरेश रैना आणि युवराज सिंग यांनी निवृत्ती घेतली आहे. तेव्हापासून टीम इंडियाला चौथ्या क्रमांकासाठी कायमस्वरूपी फलंदाज शोधता आलेला नाही. या क्रमांकावर भारतीय संघाने सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि विजय शंकर यांचा प्रयत्न केला, परंतु कोणीही तितकेसे यशस्वी होऊ शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com