No Maharashtra Players in Team India : आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा शनिवारी झाली आणि त्यानंतर निवड समितीच्या धोरणांवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर निवड समितीने कर्णधारपदाची माळ शुभमन गिलच्या गळ्यात घातली. मात्र या संघात काही जणांना संधी न मिळाल्यामुळे क्रिकेट समीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.