Team India to play a four-day practice match against India A before the England Test series : बेकनहॅम (केंट), ता. १२ : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेस सज्ज होत असताना भारतीय खेळाडूंना उद्यापासून सुरू होणारा परस्परांमधील सराव सामना महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्य भारतीय संघ आपल्याच भारत अ संघाविरुद्ध खेळणार आहे. प्रमुख खेळाडूंचा फॉर्म आणि पहिल्या कसोटीसाठी संघ रचना कशी असेल, याचाही अभ्यास या सराव सामन्यातून केला जाईल.