SAFF Championship : नवव्या जेतेपदाचे भारताचे लक्ष्य! कुवेतशी आज अंतिम लढत

SAFF Championship India vs Kuwait
SAFF Championship India vs Kuwait sakal

SAFF Championship India vs Kuwait : भारताचा फुटबॉल संघ १७ दिवसांच्या अंतरात दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. सुनील छेत्रीच्या भारतीय संघाने १८ जून रोजी आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली होती.

आता आज (४ जुलै रोजी) रंगणाऱ्या भारतीय संघासमोर सॅफ या दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत कुवेत संघाचे आव्हान असणार आहे. याप्रसंगी भारतीय संघ नवव्यांदा सॅफ स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल.

SAFF Championship India vs Kuwait
Team India : BCCI घेणार मोठा निर्णय! विराट कोहली, रोहितला देणार डच्चू?

भारत व कुवेत या दोन्ही देशांचा समावेश अ गटात होता. या दोन्ही देशांनी प्रत्येकी सात गुणांची कमाई करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. कुवेत संघाकडून आठ; तर भारत संघाकडून सात गोल करण्यात आले. त्यामुळे जास्त गोल केल्यामुळे कुवेतचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर राहिला. भारताचा संघ दुसऱ्या स्थानावर राहिला. भारताने उपांत्य फेरीच्या लढतीत लेबननचे कडवे आव्हान पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असे परतवून लावले. कुवेतने जादा वेळेत गोल करून बांगलादेशचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आणले. आता भारत-कुवेत यांच्यामध्ये मंगळवारी जेतेपदाची लढाई होणार आहे.

SAFF Championship India vs Kuwait
Neeraj Chopra : डायमंड लीग २०२३ मध्ये तंदुरुस्त नसतानाही 'सुवर्ण'; नीरज चोप्रा

इतिहास प्रतिस्पर्ध्यांच्या बाजूने

भारत-कुवेत यांच्यामधील आतापर्यंत झालेल्या लढतींच्या निकषावर नजर टाकल्यास कुवेतचे पारडे जड असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. दोन देशांमध्ये आतापर्यंत चार लढती झालेल्या आहेत. यापैकी दोन लढतींमध्ये कुवेतने बाजी मारली असून एका लढतीत भारताने विजय साकारला आहे. एक लढत बरोबरीत राहिली. इतिहास कुवेतच्या बाजूने असला तरी फॉर्म हा भारताच्या बाजूने आहे. भारतीय संघाने काही दिवसांपूर्वीच आंतरखंडीय स्पर्धा जिंकली आहे.

SAFF Championship India vs Kuwait
Suryakumar Yadav : सूर्यकुमासमोर मोठं आव्हान! डिव्हिलियर्सने दिला मोलाचा सल्ला

स्टिमॅक यांची अनुपस्थिती

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांना कुवेतविरुद्धच्या लढतीत रेफ्रींकडून लाल कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर दोन सामन्यांची बंदी लादण्यात आली. उपांत्य फेरीला त्यांची अनुपस्थिती होती. आता अंतिम फेरीतही भारतीय खेळाडू त्यांच्या अनुपस्थितीत मैदानात उतरतील. सहायक प्रशिक्षक महेश गवळी या वेळी मुख्य प्रशिक्षकांची जबाबदारी पार पाडतील.

बचावपटू संदेश झिंगन याचे अंतिम फेरीच्या लढतीत भारतीय संघात पुनरागमन होणार आहे ही आनंदाची बाब असेल. सुनील छेत्रीच्या खेळावर पूर्णपणे अवलंबून न राहता भारतीय खेळाडूंनी सांघिक कामगिरीत यश मिळवायला हवे. सहल अब्दुल समाद, महेश सिंग, उदांता सिंग यांच्याकडून सातत्याने छेत्रीला फुटबॉलचा पास मिळायला हवा. त्यानंतरच भारताला गोलांची अपेक्षा करता येणार आहे.

अंतिम सामना गमावलेला नाही

भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री याने २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तिथपासून भारतीय संघ मायदेशात खेळवण्यात आलेल्या करंडकाच्या अंतिम फेरीत पराभूत झालेला नाही. भारतीय संघाला या कामगिरीची पुनरावृत्ती करायला नक्कीच आवडेल. तसेच इगोर स्टिमॅक यांच्या अनुपस्थितीत उद्याच्या लढतीत प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणारे महेश गवळी यांच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवण्याची सुवर्णसंधी असणार आहे. भारताने २००५ मध्ये बांगलादेशला पराभूत करीत सॅफ स्पर्धा जिंकली होती. महेश गवळी त्या भारतीय संघाचे सदस्य होते. आता प्रशिक्षक म्हणून त्यांना भारताला विजेतेपद मिळवून देता येणार आहे. असे झाल्यास खेळाडू व प्रशिक्षक अशा दोन्ही भूमिकांमध्ये सॅफ स्पर्धा जिंकणारे ते भारताचे पहिलेच व्यक्ती ठरू शकतील.

सॅफ स्पर्धेचे आतापर्यंत विजेते

भारत ः ८, मालदीव ः२, बांग्लादेश ः १, अफगाणिस्तान ः१, श्रीलंका ः १.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com