
IND vs NZ: ODI धूळ चारल्यानंतर आता बारी टी-20 ची! मॅच फ्री कशी पाहाल? जाणून घ्या...
India vs New Zealand 1st T20I Live Streaming : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी रांची येथे खेळल्या जाणार आहे. या मालिकेत भारतीय संघाची कमान हार्दिक पांड्याकडे आहे, तर न्यूझीलंडचे नेतृत्व मिचेल सँटनरकडे आहे. केन विल्यमसन हा न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचा भाग नाही.
टी-20 विश्वचषकापासून भारतीय संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली या फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. टी-20 विश्वचषकानंतर भारतीय संघाने हार्दिकच्या नेतृत्वाखाली एकही टी-20 मालिका गमावलेली नाही आणि न्यूझीलंडविरुद्धही ही विजयाची मालिका कायम ठेवायची आहे.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण 22 टी-20 सामने खेळल्या गेले आहेत. यापैकी भारताने 10, तर किवी संघाने नऊ सामने जिंकले आहेत. तीन सामने बरोबरीत आहेत. दोन्ही संघ भारतात आठ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील टीम इंडियाने पाचवेळा, तर न्यूझीलंडने तीन सामने जिंकले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला T20 कधी, कोठे, किती वाजता खेळल्या जाणार आहे?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना शुक्रवार, 27 जानेवारीला रांचीच्या JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळल्या जाणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 6.30 वाजता होईल.
सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारत आणि न्यूझीलंड टी-20 मालिका प्रसारित करण्याचे अधिकार आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता.
लाइव्ह मॅच मोफत कशी बघायची?
या सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर पाहू शकता. यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही.