सलामी जोडी फोडणार कोण? किवींसमोर इंडियन गोलंदाजांचे पाडले खांदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs New Zealand
IND vs NZ : सलामी जोडी फोडणार कोण? किवींसमोर गोलंदाजांनी टाकली 'मान'

IND vs NZ : सलामी जोडी फोडणार कोण? किवींसमोर गोलंदाजांनी टाकली 'मान'

sakal_logo
By
सुशांत जाधव

न्यूझीलंडच्या सलामी जोडीने भारतीय गोलंदाजांचे अक्षरश: खांदे पाडले. टॉम लॅथम (Tom Latham) आणि विल यंग (Will Young) या जोडीनं न्यूझीलंड संघाला मजबूत स्थितीत आणले आहे. दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाअखेर 57 षटकात बिन बाद 129 धावा केल्या होत्या. टॉम लॅथम 165 चेंडूत 50 धावांवर खेळत होता. दुसऱ्या बाजूला विल यंगने 180 चेंडूचा सामना करताना 12 चौकाराच्या मदतीने 75 धावांची खेळी केली होती. भारताच्या एकाही गोलंदाजाल किवी सलामीवीरांना अडचणीत आणण्यात यश आले नाही. दुसऱ्या दिवशी कसोटी सामना न्यूझीलंडच्या बाजूनं झुकल्याचे दिसून आले.

अजिंक्य रहाणेनं न्यूझीलंडची सलामी जोडी फोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण एकाही गोलंदाजाला यश मिळाले नाही. इशांत शर्माने सर्वात कमी 6 षटके गोलंदाजी केली. यात त्याने 3 षटके निर्धाव टाकून 10 धावा खर्च केल्या. पण न्यूझीलंडच्या सलामीवीरांचा संयम तो तोडू शकला नाही. उमेश यादवनेही 10 षटकातील 3 षटके निर्धाव टाकली. त्याच्यापदरीही निराशाच आली. अश्विन, जाडेजा आणि अक्षर पटेल या फिरकीसमोरही टॉम लॅथम आणि विल यंगने संयमी खेळ केला. परिणामी न्यूझीलंचा संघ मजबूत स्थितीत पोहचला आहे.

loading image
go to top