IND vs NZ 1st Test Day 2 : साउदीचा पंजा; टीम इंडिया 300 पार... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India vs New Zealand 1st Test Day 2

IND vs NZ 1st Test Day 2 : साउदीचा पंजा; टीम इंडिया 300 पार...

sakal_logo
By
सुशांत जाधव

India vs New Zealand 1st Test Day 2 : कानपूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरने पदार्पणात शतक पूर्ण केले. पण दुसऱ्या दिवशी खरा दिवस गाजवला तो टिम साउदीनं. भारतीय संघाने 4 बाद 258 धावांवरुन खेळ पुढे सुरु केला. साउदीनं रविंद्र जाडेजाला दुसऱ्या दिवशी एकही धाव न करता माघारी धाडले. जाडेजाने 112 चेंडूत 50 धावा केल्या. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या वृद्दिमान साहाने एका धावेची भर घातली.अश्विन आणि अय्यरने तळाच्या फलंदाजीत 17 धावांची भागीदारी रचली. या जोडीने भारतीय संघाची धावसंख्या 300 पार नेली. शतकी खेळी करणाऱ्या अय्यरलाही साउदीनंच बाद केले. अक्षर पटेलच्या रुपात साउदीनं पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात 5 विकेट पूर्ण केल्या.

हेही वाचा: गावसकरांचा आशीर्वाद अन् अय्यरनं पदार्पणात ठोकलं शतक

कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात कायले जेमीसनने कमाल करुन दाखवत भारतीय संघातील आघाडीच्या फलंदाजांना बाद केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दुसरा दिवस न्यूझीलंडचा दुसरा जलदगती गोलंदाज साउदीनं गाजवला. त्याने अय्यर-जाडेजा जोडी फोडली. एवढेच नाही तर दोघांनाही त्यानेच बाद केले. याशिवाय पाच विकेट घेण्याचा पराक्रमही करुन दाखवला.

loading image
go to top